ख्वाला बिंत अल-अझवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ख्वाला बिंत अल-अझवार
इतिहासाच्या पुस्तकात चित्रित केल्याप्रमाणे खवला बिंत अल-अझवार युद्धात उतरत आहे
मातृभाषेतील नाव خولة بنت الازور
जन्म मक्का, आत्याचे सौदी अरेबिया
मृत्यू ६३९
सीरिया
Allegiance रशिदुन खलिफत
सेवावर्षे ६२९–६३६
सैन्यपथक महिला सेनापती
लढाया व युद्धे सनिता-अल-उकाबची लढाई (६३४)
अजनादयाची लढाई (६३४)
यर्मुकची लढाई (६३६)

ख्वाला बिंत अल-अझवार (अरबी: خولة بنت الازور ; मृत्यू वर्ष 639), रशिदुन खलिफाच्या सेवेत एक अरब मुस्लिम योद्धा होती. लेव्हंटच्या मुस्लिमांच्या विजयात तिने मोठी भूमिका निभावली आणि तिचा भाऊ धिरार याच्या बरोबरीने लढलो. इतिहासातील महान महिला सैनिकांपैकी एक म्हणून तिचे वर्णन केले जाते. ती इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांची सहचर होती. [१]

ती अझवर अल असदीची मुलगी होती, ख्वाला बनू असद टोळीच्या प्रमुखांपैकी एक, ख्वाला लेव्हंटच्या भागांमध्ये (म्हणजे पॅलेस्टाईन, सीरिया, लेबनॉन) मुस्लिमांच्या विजयांच्या मोहिमांमध्ये तिच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होती.[२]

लष्करी कारकीर्द[संपादन]

ख्वालाचा जन्म ७ व्या शतकात झाला. तिचे वडील बनू असद टोळीचे प्रमुख होते. तिचे कुटुंब सुरुवातीच्या काळात इस्लाम स्वीकारणाऱ्यांपैकी एक होते. तिचा भाऊ धीरार हा अत्यंत कुशल योद्धा होता आणि त्याने ख्वालाला भाला, तलवारबाजी आणि मार्शल आर्ट्स शिकण्यापासून लढाईबद्दल माहिती असलेल्या सर्व गोष्टी शिकवल्या होत्या.[३]

अजनादिनच्या लढाईत, ख्वालाहने मुस्लिम सैन्यासोबत जखमी सैनिकांना वैद्यकीय मदत पुरवली. तिचा भाऊ दिरार बायझेंटाईन सैन्याने पकडल्यानंतर, ख्वलाहने नाइटचे चिलखत, शस्त्रे आणि घोडी घेतली आणि स्वतःला हिरवा शालू लपेटून घेतला आणि मुस्लिम सैनिकांवर हल्ला करणाऱ्या बायझेंटाईन बटालियनशी लढा दिला. खालिद दिसण्यापर्यंत अनेक मुस्लिम सैनिकांना ख्वालाहच खालिद असल्याचे वाटत होते. रशिदुन आर्मी कमांडरांपैकी एक, शुरहबिल इब्न हसना, यांनी तिच्याबद्दल असे म्हटले आहे की:

हा योद्धा खालिद इब्न वलिद सारखा लढतो, पण मला खात्री आहे की तो खालिद नाही.

मुस्लिम सैन्याने रणांगणातून पळून गेलेल्या बायझंटाईन्सचा पराभव केला. खालिदने आपल्या सैन्याला पळून जाणाऱ्या बायझंटाईन्सचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. लवकरच ते पकडले गेले आणि शोध घेतल्यानंतर मुस्लिम कैदी सापडले आणि त्यांची सुटका झाली.[४]

तिच्याबद्दल प्रसिद्ध किस्सा[संपादन]

काही पारंपारिक स्त्रोतांचा असा दावा आहे आणि इतिहासकार अल-वाकिदी यांच्या मते, कि एखादं लढाईत, तिची घोडी मारली गेली आणि ती जखमी होऊन कैदी झाली. तिला इतर महिलांसोबत एका छावणीत नेण्यात आले. त्यांच्या (म्हणजे बायझेंटाईनच्या) नेत्याने कैदी आपल्या सेनापतींना दिले आणि ख्वालाला त्याच्या खोलीत हलवण्याचा आदेश दिला. तिला राग आला आणि तिने ठरवले की अपमानित जगण्यापेक्षा मरणे अधिक सन्माननीय आहे. ती इतर स्त्रियांमध्ये उभी राहिली आणि त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी लढा अन्यथा शहीद होण्यासाठी बोलावले. कॅमपातिल महिलांनी एकजूट दाखवून ख्वालाहने सांगितल्याप्रमाणे तंबूचे खांब आणि खुंटे घेतले आणि रोमन रक्षकांवर हल्ला केला, तिने त्यांना सांगितल्याप्रमाणे एक घट्ट वर्तुळ तयार केले. त्यांनी 30 रोमन सैनिकांना ठार मारण्यात यश मिळवले, त्यापैकी पाच ख्वलाने स्वतः मारले, ज्यात तिच्यावर बलात्कार करू इच्छिणाऱ्या सैनिकाचा समावेश होता. त्यानंतर ते सर्वजण फरार झाले.[५][१]

वारसा[संपादन]

ख्वालाच्या लढाऊ कौशल्याचे उमरने कौतुक केले. उमर हा इस्लाममधील दुसरे खलीफा होते. सौदी अरेबियातील अनेक रस्त्यांना आणि शाळांना तिच्या नावावर ठेवण्यात आले आहे. अनेक अरब शहरांमध्ये 'ख्वाला बिंत अल-अझवार' नावाच्या शाळा आणि संस्था उपस्थित आहेत. उदाहरणार्थ, खवलाहच्या सन्मानार्थ इराकी सर्व महिला सैन्य युनिटला 'ख्वाला अल-अझवार युनिट' असे नाव देण्यात आले आहे.[६] संयुक्त अरब अमिरातीमध्ये, महिलांसाठीचे पहिले लष्करी महाविद्यालय, ख्वाला बिंत अल अझवर ट्रेनिंग कॉलेज, हे देखील तिच्या नावावर आहे.[६] "इतिहासातील अरब महिला" चा भाग म्हणून जॉर्डनने तिच्या सन्मानार्थ एक स्टॅम्प जारी केला आहे.[७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "15 Important Muslim Women in History" [इतिहासातील 15 प्रमुख मुस्लिम महिला]. Islamophobia Today (इंग्रजी भाषेत). 12 मार्च 2014. Archived from the original on 6 ऑक्टोबर 2021. 21 नोव्हेंबर 2014 रोजी पाहिले.
  2. ^ खान, मरियम (7 मार्च 2020). "Inside the untold history of revolutionary Muslim women". The New Arab (इंग्रजी भाषेत). 2 फेब्रुवारी 2024 रोजी पाहिले.
  3. ^ खान, हमजा (19 एप्रिल 2017). "Khawla Bint Al-Azwar: The Great Woman Warrior Pride For Muslims". Parhlo (इंग्रजी भाषेत). 2 फेब्रुवारी 2024 रोजी पाहिले.
  4. ^ Abul Husn, Ma'an (May 2003). "Khawla Bint Al-Azwar: The Islamic Heroine". (इंग्रजी भाषेत), 2 फेब्रुवारी 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Khawla Bint Al Azwar". Ink of Faith. 2 फेब्रुवारी 2024 रोजी पाहिले.
  6. ^ a b "The rich tales of women who went to war" [युद्धात गेलेल्या स्त्रियांच्या समृद्ध कथा]. The National (इंग्रजी भाषेत). 2016-09-21.
  7. ^ "Khawla Bint Al Azwar, Warrior, Famous Arab Woman, Islam Religion Horse Animal, MNH Jordan - Delcampe.net". web.archive.org. 29 नोव्हेंबर 2014. Archived from the original on 2014-11-29.