खुलना विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खुलना विभागाचे नकाशावरील स्थान

खुलना विभाग
খুলনা বিভাগ
बांगलादेशचा विभाग

खुलना विभागचे बांगलादेश देशाच्या नकाशातील स्थान
खुलना विभागचे बांगलादेश देशामधील स्थान
देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
राजधानी खुलना
क्षेत्रफळ २२,२८४ चौ. किमी (८,६०४ चौ. मैल)
लोकसंख्या १,५६,८७,७५९
घनता ७०० /चौ. किमी (१,८०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BD-D
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
संकेतस्थळ https://khulna.gov.bd/

खुलना (बंगाली: খুলনা বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या नैऋत्य भागात स्थित असून त्याच्या पश्चिमेस पश्चिम बंगाल राज्याचे उत्तर २४ परगणादक्षिण २४ परगणा हे जिल्हे; दक्षिणेस बंगालचा उपसागर तर इतर दोन दिशांना बांगलादेशाचे इतर विभाग आहेत. खुलना विभागाचा बराचसा भूभाग गंगा त्रिभुज प्रदेशाने व्यापला आहे. त्याचबरोबर सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल ह्याच विभागामध्ये आहे. खुलना नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली खुलना विभागाची लोकसंख्या सुमारे १.५७ कोटी होती.

बाह्य दुवे[संपादन]