खंडेनवमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फुलबाजार झेंडूची फुले

खंडेनवमी हा दिवस आश्विन शुक्ल नवमीला साजरा केला जातो.[१]हिंदू धर्म - परंपरेत या दिवशी शस्त्रपूजन केले जाते.[२] हा विजयादशमीच्या आधीचा दिवस असतो.[३]

लढाऊ जमातीचा उत्सव[संपादन]

भारतातील लढवय्या जमातीचा हा विशेष सण भारतभरात साजरा केला जातो. राजस्थानात खड्गपूजेचा विशेष महोत्सव साजरा केला जाई.नवरात्रीच्या काळात या शस्त्रांची मिरवणूक काढली जात असे.[४]

संस्थानिक घराण्यात[संपादन]

संस्थानिक घराण्यात या दिवशी नवरात्रीनिमित्त देवीला कोहळ्याचा बळी दिला जातो. पशुबली पद्धती बंद झाल्यानंतर कोहळ्याचा बळी देण्याची प्रथा सुरू झालेली दिसते.[५]

ग्रामीण संस्कृतीत[संपादन]

खंडे नवमीच्या दिवशी गावातील शेतकरी हे शेतीची अवजारे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात. या दिवशी शिल्पकार आणि कारागीर आपआपल्या पारंपरिक कौशल्याच्या अवजारांची पूजा करतात..[६]

महाराष्ट्रातील लोकदैवत श्री ज्योतिबा (कोल्हापूर) याचा पालखीसोहळा खंडेनवमीच्या दिवशी साजरा होतो.[७]

आदिवासी प्रांतांत[संपादन]

नवरात्री आणि त्यानिमित्त होणारे उत्सव आदिवासीबहुल प्रांतात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरे होतात. नवरात्रीनिमित्त जय्रा भरतात. पोतराज हे या प्रांतांत विशेष आकर्षण असते. पशुबळी देतात आणि पशूच्या रक्ताने देवीला अभिषेक करतात. खंडेनवमीच्या दिवशी या जत्रेची सांगता होते.[८]

व्यावसायिक क्षेत्रांत[संपादन]

आधुनिक काळात गावोगावच्या मोठ्या कारखान्यांमध्ये खंडेनवमीच्या दिवशी कारखाना स्वच्छ करतात. यंत्रांची आणि अवजारांची पूजा होते. रांगोळी काढून, झेंडूची फुले सजवून या दिवसाचा उत्साह वाढविला जातो.[९]

हे सुद्धा पहा[संपादन]

विजयादशमी

शारदीय नवरात्र

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bhatt, S. C. (2005). Land and people of Indian states and union territories : (in 36 volumes). 1. India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178353937.
  2. ^ Joshi, Shankar Baldixit (1980). Marhati saskrti, kahi samasya. Vhinasa Prakasana.
  3. ^ The Journal of the Anthropological Society of Bombay (इंग्रजी भाषेत). Education Society's Press. 1912.
  4. ^ जोशी , होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन. pp. ६१२.
  5. ^ Sunthankar, S. S. (1974). Śrīrāmanātha darśana. Jijñāsā Prakāśana.
  6. ^ Dasarā-Divāḷī. Mahārāshṭra Śāsana Śikshaṇa Vibhāga, Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīsāṭhī. 1990.
  7. ^ "पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापित जोतिबा मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ (महाराष्ट शासन)". Archived from the original on 2019-10-07. ७. १०. २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ Ghatage, Babasaheb Sadashiv (2006-01-01). Nomadic Tribes And Social Work In India (इंग्रजी भाषेत). Shruti Publications. ISBN 9788190205559.
  9. ^ "पिंपरी-चिंचवडमध्ये खंडेनवमी उत्साहात साजरी". पिंपरी चिंचवड बुलेटिन. ७. १०. २०१९. ७. १०. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)