Jump to content

कोहळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोहोळ्याचा वेल व पाने
कोहाळा
(पिकलेला) काशीकोहळा-कोहोळ्यातील एक प्रकार

कोहळा किंवा कोहाळा किंवा हिंदीत पेठा ही भारतात खाल्ली जाणारी एक फळभाजी आहे. हिला पांढरा भोपळा असेही म्हणतात. हा दुधी भोपळ्याप्रमाणे बहुधा हिरवट रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल जमिनीवर सरपटत जातो. हे फळ आकाराने आवळ्यासारखे गोल असते. त्यावरूनच आवळा देऊन कोहळा काढणे ही म्हण मराठीत आली.

अन्य नावे : शास्त्रीय नाव : Benincasa hispida

  • इंग्रजी : Ash Gourd, Winter Melon

भारतातील आग्रा येथे बनणारी पेठा नावाची गोड मिठाई कोहळ्यापासून बनते. ही मिठाई बर्फाच्या वडीसारखी अर्धपारदर्शक असते.

कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते, असा विश्वास आहे.[]

कोहळ्यापासून बनणारे पदार्थ

[संपादन]

भाजी, कोहळ्याचे तुकडे घातलेले दक्षिण भारतीय सांभार, रायते, सूप, सांडगे, कोहळेपाक, पेठा,

कोहळेपाक हा पौष्टिक समजला जातो. हा बाजारात मिळतो. हा द्रवस्वरूपात असतो.

कार्तिक शुक्ल नवमीला कुष्मांड नवमी, किंवा अक्षय नवमी म्हणतात. या दिवसाला महाराष्ट्राबाहेरचे लोक आवळा नवमी म्हणतात.

वास्तुशास्त्रातील एक समजूत : वास्तूमधून नजरदोष शोषून घेतल्यावर हे फळ नासते. म्हणजे दरवाज्यावर टांगलेला कोहळा खराब झाला तर नकारात्मक शक्ती नाश पावली असे समजून, पुन्हा दुसरे फळ घरात उंबरठ्यावर चार चौघांना दिसेल असे बांधून ठेवतात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Swami, Archana (2024-08-18). "कोहळा का बांधावा? बांधण्याची पद्धत, फायदे, पूजा, काजळ रेष". Pune Latest. 2024-08-18 रोजी पाहिले.