शिल्पकला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिल्पकार या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
महाराष्ट्रामधील घारापुरी लेण्यांमधील 'त्रिमूर्ती'चे पाषाणशिल्प
अदाल्ज (अहमदाबाद) येथील प्राचीन विहीर

शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.

मार्कंडा येथील देवळावर दगडात कोरलेली 'ब्रम्हेशानजनार्दनार्क' मूर्ती.

संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे.[१]

भारतातील प्राचीन शिल्पकला/मूर्तीकला[संपादन]

भारतातील एखाद्या प्राचीन देवदेवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे, अलंकार इत्यादी असतात. ते कोरण्याच्या शैलीवरुन ती मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे हे ओळखता येते. अशी प्रतिमा अथवा मूर्ती कोरतांना ती सौंदर्यपूर्ण, लयबद्ध कशी होईल याचाही ती मूर्ती घडविणारा कलाकार विचार करतो. मूर्ती बहुदा एकसंध पाषाणातूनच कोरली जाते. त्यासमवेतच त्या मूर्तीतील आयुधे, अलंकार देखील कोरल्या जातात. पण ते इतके अप्रतिम असतात कि ते मूर्तीसमवेतच कोरले असे बघणाऱ्याला जाणवत नाही. ते अलंकार/आयुधे ही मूर्ती कोरल्यावर घातल्या गेलीत असे वाटते.[२]

शैली किंवा डौल[संपादन]

मूर्तीत वेगवेगळ्या बसण्याच्या अथवा उभे राहण्याच्या शैली असतात. त्यास डौलही म्हणतात.[२]

 • आसनपर्यक
 • अर्धपर्यक
 • आलीढ
 • प्रत्यालीढ
 • पद्म
 • वीर - इत्यादी[२]

उभी राहण्याची शैली[संपादन]

यात शरीरास असलेल्या वाकास 'भंग' असे नाव आहे.[२]

 • समभंग
 • त्रिभंग
 • अतिभंग[२]

आयुधे व उपकरणे[संपादन]

मूर्त्यांनी धारण केलेली आयुधे व उपकरणे खालील प्रकारची असू शकतात.[२]

आयुधे[संपादन]

इत्यादी.[२]

उपकरणे[संपादन]

इत्यादी.[२]

मुद्रा[संपादन]

हाताचा तळवा व बोटे यांच्या सहाय्याने तयार केलेल्या विविध मुद्रा.प्राचीन शास्त्रात याचाही सखोल विचार केल्या गेला आहे.त्या मुद्रा खालील प्रकारे असू शकतात.[२]

इत्यादी.[२]

मूर्तींचे अलंकार[संपादन]

इत्यादी.[२]

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड
 2. a b c d e f g h i j k लेखक:संजीव देशपांडे (दि.०९/०३/२०१७). तरुण भारत, नागपूर, ई-पेपर, फुलऑन पुरवणी, पान क्र. २ प्रतिमांची व्यथा. नरकेसरी प्रकाशन नागपूर. दि.०९/०३/२०१७ रोजी पाहिले.