Jump to content

श्रेया घोषाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्षेया घोशाल या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रेया घोषाल

श्रेया घोषाल
आयुष्य
जन्म १२ मार्च, १९८४ (1984-03-12) (वय: ४०)
जन्म स्थान बहरामपूर, पश्चिम बंगाल
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका
गौरव
पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार (२००३, २००६, २००८, २००९)
फिल्मफेअर पुरस्कार (२००३, २००४, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२)

श्रेया घोषाल (जन्म : मार्च १२, १९८४) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची पार्श्वगायिका आहे. तिने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम , तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.

श्रेयाने सा रे ग म प ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकीर्द सुरू झाली. तिने देवदास या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार तसेच फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाले.[१] तेव्हापासून तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार व ७ दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

श्रेया मार्च १२, १९८४[२] रोजी दुर्गापूर येथील बंगाली कुटुंबात मुर्शिदाबाद जिल्हा, पश्चिम बंगालमध्ये जन्मली.[३] ती रावतभाटा या राजस्थानातील छोट्या गावात वाढली. तिचे वडील बिश्वजीत घोषाल हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.[४]

चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण कोट्यातील महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले.[५]

तिने खास लहान मुलांसाठी असलेली सा रे ग म ही झी टीव्हीवरील स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून असलेल्या कल्याणजी यांनी तिच्या पालकांना मुंबईत येण्याबद्दल सांगितले.[६] मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले.[५]

ती आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, रावतभाटा आणि आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, अणुशक्ती नगर (मुंबई) या शाळांत शिकली. शाळेनंतर एसआयईएस कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला.[४]

फिल्मोग्राफी

[संपादन]

घोषाल अनेक टेलिव्हिजन रिॲलिटी शोमध्ये न्यायाधीश म्हणून हजर झाली आहे. ती देखील संगीत-व्हिडिओमध्येही दिसते.

पुरस्कार आणि नामनिर्देशने

[संपादन]

घोषालने सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक गाण्यासाठी चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत: "बैरी पिया" देवदास (२००२) साठी,[७]"धीरे जालना" पाहेली (२००५) साठी, [८]"ये इश्क है" जब वी मेट (२००७) साठी,[९] आणि "फेरी सोम" या गाण्यासाठी एक पुरस्कार अंतहीन (२००८) या बंगाली चित्रपटासाठी आणि जोगवा (२००८) या मराठी चित्रपटासाठी "जीव रंगला".[१०] तिने सात फिल्मफेर पुरस्कार जिंकले आहेत: नवीन संगीत प्रतिभेसाठी एक आरडी बर्मन पुरस्कार,[११] आणि देवदास (२००२)च्या “डोला रे डोला” साठी सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक सिंगर प्रकारातील सहा पुरस्कार,[११] जिस्म (२००४) साठी "जादू है नशा है",[१२] गुरूसाठी "बारसो रे" (२००८),[१३] सिंग इज किंग (२००८) साठी "तेरी ओर",[१४] "दिवानी मस्तानी" बाजीराव मस्तानी (२०१६ )पद्मावत (२०१९) साठी "घुमार". आत्तापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक सिंगरसाठी घोषालने फिल्मफेर ॲवॉर्ड्‌स् (अवॉरड्स्) साऊथ देखील जिंकले आहेत.[१५]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
 1. ^ Priyanka Dasgupta (21 July 2002). "Singing in Devdas was God's greatest gift: Shreya Ghoshal". The Times of India. 2002-07-21 रोजी पाहिले.
 2. ^ "Listen to 15 Popular Song By Bollywood's Melody Queen- Shreya Ghoshal". News18 (इंग्रजी भाषेत). 2017-03-12. 2021-02-05 रोजी पाहिले.
 3. ^ "I like my father being the boss in my life: Shreya - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-02-05 रोजी पाहिले.
 4. ^ a b "श्रेया घोषालची माहिती". सा रे ग म. ७ जानेवारी २०११ रोजी पाहिले.
 5. ^ a b "Singer Interview: Shreya Ghoshal". hindisong.com. 2011-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-03 रोजी पाहिले.
 6. ^ "'I simply closed my eyes and sang'". rediff.com.
 7. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2016-03-03. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-03-03. 2021-02-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
 8. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2013-10-29. रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-12-15. 2021-02-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
 9. ^ "'Kanchivaram' wins national award for best feature film - The Hindu". web.archive.org. 2014-05-05. रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-05-05. 2021-02-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
 10. ^ Jan 23, Agencies /; 2010; Ist, 16:20. "National Film Awards: Priyanka gets best actress, 'Antaheen' awarded best film | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-02-05 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
 11. ^ a b "The 48th Filmfare Awards". web.archive.org. 2016-09-15. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-09-15. 2021-02-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
 12. ^ "Winners of the 49th Manikchand Filmfare Awards - Times of India". web.archive.org. 2016-09-15. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-09-15. 2021-02-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
 13. ^ "53rd Fair one Filmfare awards 2007 winners - bollywood news : glamsham.com". web.archive.org. 2016-09-15. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-09-15. 2021-02-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
 14. ^ "54th Idea Filmfare Awards 2008 Winners - bollywood news : glamsham.com". web.archive.org. 2016-09-15. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-09-15. 2021-02-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
 15. ^ "'Utmost pleasure' singing for cinema of South India: Shreya Ghoshal | music | Hindustan Times". web.archive.org. 2017-03-22. रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-03-22. 2021-02-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)