Jump to content

केळापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केळापूर. या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?केळापूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुकानांव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
सभापती
तहसील मुख्यालय पांढरकवडा
पंचायत समिती केळापूर


केळापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील एक तालुक्याचे नांव आहे.

निर्मिती & मुख्यालय

[संपादन]

या तालुक्याची निर्मिती १८७५ मध्ये तत्कालीन यवतमाळ आणि वणी तालुक्यातून काही गावे वगळून करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नावाच्या शहराजवळ केळापूर नावाचे गांव आहे.

तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालये आदि महत्त्वाची कार्यालये पांढरकवडा शहरात असून या तालुक्यातील एकमात्र नगरपरिषद तेथेच आहे.

पांढरकवडा आणि केळापूर गावांमधून खुनी नावाची नदी वाहते. ही पैनगंगा नदीची उप नदी आहे. दुसरे बाजीराव पेशवे यांचा पाडाव याच खुनी नदीच्या किनाऱ्यावर झाला.

समाजजीवन

[संपादन]

या भागात "कोलाम" आणि "गोंड" हे आदिम समाज मुख्य आहेत. कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन, ई. पिके महत्त्वाची आहेत. या तालुक्याच्या दक्षिणेस आंध्र प्रदेश राज्य आहे. उत्तर आणि दक्षिण भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ या गावातून जातो.

टिपेश्वर अभयारण्य व व्याघ्रप्रकल्प

[संपादन]

केळापूर गावापासून टिपेश्वर नावाचे वन्यजीव अभयारण्य अगदी जवळ आहे. या अभ्यारण्यात याच नावाचे गाव असून तेथे कोलाम आणि गोंड आदिवासी एकत्र राहतात. इथून जवळच टिपाई देवीचे प्राचीन देऊळ आहे. या देवीच्या नावावरूनच याला टिपेश्वर नाव पडले. हे अभयारण्य डोंगराळ असून येथे जाण्यासाठी रस्ता फार चांगला नाही. गावाला लागूनच इंग्रजांच्या काळातील एक छोटेसे विश्रामगृह आहे. अभयारण्यात विविध पक्षी, सस्तनी प्राणी, साप आणि झाडे आहेत. हे पानगळीचे जंगल आहे, पाऊस मध्यम स्वरूपाचा पडत असल्याने येथे वर्षभर पाण्याची उपलब्धता नसते. उन्हाळ्यात झाडांची पाने गळून गेलेली असतात.

तालुक्यातील गावे

[संपादन]
  1. अडणी
  2. अकोली बुद्रुक
  3. अकोली खुर्द
  4. आंभोरा (केळापूर)
  5. अंधारवाडी
  6. आरळी
  7. आसोळी (केळापूर)
  8. बाग्गी
  9. बहात्तर
  10. बल्लारपूर (केळापूर)
  11. बेलोरी
  12. भादुमारी
  13. बोरगाव (केळापूर)
  14. बोरी (केळापूर)
  15. बोथ (केळापूर)
  16. चाळबार्डी (केळापूर)
  17. चाणई
  18. चाणाखा
  19. चिखलदरा (केळापूर)
  20. चोपण
  21. दाभा (केळापूर)
  22. दर्यापूर (केळापूर)
  23. देहाळी
  24. धारणा (केळापूर)
  25. ढोकी
  26. डोंगरगाव (केळापूर)
  27. गणेशपूर (केळापूर)
  28. घाणमोड
  29. घोडदरा
  30. घोणशी
  31. घुबडी
  32. गोंदवाकाडी
  33. गोपाळपूर (केळापूर)
  34. हिवरधारी
  35. हिवरी
  36. जवाहरनगर
  37. जिरा
  38. जोगिनकावडा
  39. कारंजी रोड
  40. करणवाडी
  41. कारेगाव (केळापूर)
  42. कवठा (केळापूर)
  43. केगाव (केळापूर)
  44. केळापूर.
  45. खैरगाव
  46. खैरगाव बुद्रुक
  47. खैरगाव देशमुख
  48. खैरगाव खुर्द
  49. खैरी
  50. खातरा
  51. किन्हाळा
  52. किन्ही (केळापूर)
  53. कोडोरी
  54. कोंढी
  55. कोंघारा
  56. कोपामांडवी
  57. कोथोडा
  58. कृष्णापूर
  59. कुसाळ
  60. लिंगाटी (केळापूर)
  61. महांडोळी
  62. मलकापूर (केळापूर)
  63. मांगी (केळापूर)
  64. मांगुर्डा
  65. मराठ वाकडी
  66. मारेगाव (केळापूर)
  67. मारेगाव बुद्रुक
  68. मारेगाव खुर्द
  69. मिरा
  70. मोहाडा
  71. मोहादरी
  72. मोरवा
  73. मुची
  74. मुंझळा
  75. नागेझरी खुर्द
  76. नाईक सुकळी
  77. नांदगाव (केळापूर)
  78. नांदपूर
  79. निळजाई
  80. निमडेली
  81. पाढा
  82. पड्याळी
  83. पाहपाळ
  84. पांढरवणी बुद्रुक
  85. पांढरवणी खुर्द
  86. पाथरी (केळापूर)
  87. पाटोदा (केळापूर)
  88. पेंढारी (केळापूर)
  89. पिळखाना
  90. पिंपळापूर
  91. पिंपळखुटी
  92. पिंपळशेंडा
  93. पिंपरी (केळापूर)
  94. पिंपरी रोड
  95. पितापोंगरी
  96. राधापूर
  97. रुधा
  98. रुंझा
  99. सायखेड (केळापूर)
  100. साखरा बुद्रुक
  101. साखरा खुर्द (केळापूर)
  102. साखी बुद्रुक
  103. शामपूर
  104. सिंघलदिप
  105. सोनबर्डी
  106. सोनुर्ली (केळापूर)
  107. सुकळी (केळापूर)
  108. सुन्ना
  109. सुरदेवी (केळापूर)
  110. सुसरी
  111. ताड उमरी
  112. तातापूर
  113. तेलंग टाकळी
  114. टेंभी (केळापूर)
  115. तिवसाळा (केळापूर)
  116. टोकवांजरी
  117. उमरी रोड
  118. वसंत नगर
  119. वृंदावन टाकळी
  120. वाधोणा बुद्रुक
  121. वाधोणा खुर्द
  122. वडनेर
  123. वाडवत
  124. वागाडा
  125. वाघोळी (केळापूर)
  126. वाई (केळापूर)
  127. वांजरी
  128. वारहा
  129. वासरी (केळापूर)
  130. वाथोडा
  131. वेदाड (केळापूर)
  132. येडळापूर
  133. झोळापूर
  134. झुळी
  135. झुंझारपूर

[]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/

यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
उमरखेड तालुका | झरी जामणी तालुका | घाटंजी तालुका | आर्णी तालुका | केळापूर तालुका | कळंब तालुका | दारव्हा तालुका | दिग्रस तालुका | नेर तालुका | पुसद तालुका | बाभुळगाव तालुका | यवतमाळ तालुका | महागाव तालुका | मारेगाव तालुका | राळेगाव तालुका | वणी तालुका
  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/yavatmal/kelapur.html