केळापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?केळापूर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील केळापूर
पंचायत समिती केळापूर

गुणक: 19°59′59″N 78°31′57″E / 19.99972°N 78.53250°E / 19.99972; 78.53250


केळापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याची निर्मिती १८७५ मध्ये तत्कालीन यवतमाळ आणि वणी तालुक्यातून काही गावे वगळून करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा (Pandharkawada 20° N, 78° 32' E) नावाच्या शहराजवळ केळापूर नावाचे गाव आहे. येथे जगदंबा देवीचे आणि चतुर्मुखी गणेशाचे अतिशय प्राचीन देवालय आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालये आदि महत्त्वाची कार्यालये पांढरकवडा शहरात असून या तालुक्यातील एकमात्र नगर परिषदही तेथेच आहे.

पांढरकवडा आणि केळापूर गावांमधून खुनी नावाची नदी वाहते. ही पैनगंगा नदीची उप नदी आहे. दुसरे बाजीराव पेशवे यांचा पाडाव याच खुनी नदीच्या किनाऱ्यावर झाला.

या भागात "कोलाम" आणि "गोंड" हे आदिम समाज मुख्य आहेत. कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन, ई. पिके महत्त्वाची आहेत. या तालुक्याच्या दक्षिणेस आंध्र प्रदेश राज्य आहे. उत्तर आणि दक्षिण भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ या गावातून जातो.

केळापूर गावापासून टिपेश्वर नावाचे वन्यजीव अभयारण्य अगदी जवळ आहे. या अभ्यारण्यात याच नावाचे गाव असून तेथे कोलाम आणि गोंड आदिवासी एकत्र राहतात. इथून जवळच टिपाई देवीचे प्राचीन देऊळ आहे. या देवीच्या नावावरूनच याला टिपेश्वर नाव पडले. हे अभयारण्य डोंगराळ असून येथे जाण्यासाठी रस्ता फार चांगला नाही. गावाला लागूनच इंग्रजांच्या काळातील एक छोटेसे आराम गृह आहे. अभयारण्यात विविध पक्षी, सस्तनी प्राणी, साप आणि झाडे आहेत. हे पानगळीचे जंगल आहे, पाऊस मध्यम स्वरूपाचा पडत असल्याने येथे वर्षभर पाण्याची उपलब्धता नसते. उन्हाळ्यात झाडांची पाने गळून गेलेली असतात.

चित्रदालन[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
उमरखेड | झरी जामणी | घाटंजी | आर्णी | केळापूर | कळंब | दारव्हा | दिग्रस | नेर | पुसद | बाभुळगाव | यवतमाळ तालुका | महागांव | मारेगांव | राळेगांव | वणी, यवतमाळ