कॅलिफोर्निया
कॅलिफोर्निया California | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | साक्रामेंटो | ||||||||||
मोठे शहर | लॉस एंजेलस | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ३वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ४,२३,९७० किमी² | ||||||||||
- रुंदी | ४०० किमी | ||||||||||
- लांबी | १,२४० किमी | ||||||||||
- % पाणी | ४.७ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत १वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ३,७२,५३,९५६ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ९०.५/किमी² (अमेरिकेत ११वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $६१,०२१ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | ९ सप्टेंबर १८५० (३१वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-CA | ||||||||||
संकेतस्थळ | ca.gov |
कॅलिफोर्निया (इंग्लिश: California) हे अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे (अलास्का व टेक्सास खालोखाल). अमेरिकेच्या ५० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया राज्यात स्थित आहेत.
कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, दक्षिणेला मेक्सिकोचे बाहा कॅलिफोर्निया हे राज्य, उत्तरेला ओरेगॉन तर पूर्वेला नेव्हाडा व ऍरिझोना ही राज्ये आहेत. सॅक्रामेंटो ही कॅलिफोर्नियाची राजधानी असून लॉस ऍन्जलीस हे सर्वात मोठे शहर व महानगर आहे.
१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणींचा शोध लागला व अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणाऱ्या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले. लॉस ऍन्जलीस येथील हॉलिवूड ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने बेट देणाऱ्या पर्यटकांमुळे व सिलिकॉन व्हॅलीमधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. सध्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलणाऱ्या कॅलिफोर्नियाचा जीडीपी $१.८१२ सहस्रअब्ज इतका आहे.
मोठी शहरे
[संपादन]खालील १० शहरे कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठी शहरे आहेत.
क्रम | शहर | लोकसंख्या | चित्र | वर्णन |
---|---|---|---|---|
१ | लॉस ऍन्जलीस | ३७,९२,६२१ | अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे व देशाच्या अर्थकारणामधील आघाडीचे शहर. हॉलिवूड येथील सिनेउद्योग जगातील सर्वात मोठा आहे. | |
२ | सॅन डियेगो | १३,०७,४०२ | हे शहर अमेरिकेमधील सर्वात राहण्यायोग्य शहर मानले जाते. | |
३ | सॅन होजे | ९,४५,९४२ | अमेरिकेतील दहाव्या क्रमांकाचे व सिलिकॉन व्हॅलीमधील प्रमुख शहर. | |
४ | सॅन फ्रॅन्सिस्को | ८,०५,२३५ | एक आंतरराष्ट्रीय पर्यटनकेंद्र. | |
५ | फ्रेस्नो | ५,०२,३०३ | कॅलिफोर्नियाच्या कृषीप्रधान भागातील एक मोठे शहर. | |
६ | सॅक्रामेंटो | ४,९०,४८८ | उत्तर भागात वसलेले हे शहर कॅलिफोर्नियाची राजधानी आहे. | |
७ | लॉंग बीच | ४,६२,२५७ | लॉस ऍन्जलीसचे उपनगर असलेले हे शहर जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. | |
८ | ओकलंड | ३,९०,७२४ | सॅन फ्रॅन्सिस्को भागातील एक मोठे शहर | |
९ | बेकर्सफील्ड | ३,४७,४८३ | कॅलिफोर्नियातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर. | |
१० | ऍनाहाइम | ३,३६,२६५ | ऑरेंज काउंटीमधीला सर्वात मोठे शहर |
गॅलरी
[संपादन]-
नेव्हाडाच्या सीमेवर स्थित टाहो सरोवर.
-
सॅन फ्रान्सिस्कोमधील जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज.
-
कॅलिफोर्नियामधील प्रमुख रस्ते व महामार्ग
-
कॅलिफोर्निया राज्य संसद भवन
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |