किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
(किंग अब्दुल अझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ مطار الملك عبدالعزيز الدولي | |||
---|---|---|---|
आहसंवि: JED – आप्रविको: OEJN
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | सौदी सर्वसाधारण नागरी उड्डाण ॲथॉरिटी (GACA) | ||
कोण्या शहरास सेवा | जेद्दाह | ||
स्थळ | जेद्दाह, सौदी अरेबिया | ||
हब | सौदिया फ्लायनास | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ४८ फू / १५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 21°40′46″N 039°09′24″E / 21.67944°N 39.15667°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
16L/34R | 4,000 | 13,124 | डांबरी |
16C/34C | 3,299 | 10,825 | कॉंक्रीट |
16R/34L | 3,800 | 12,467 | डांबरी |
सांख्यिकी (2010) | |||
प्रवासी | 2,71,11,000 | ||
आर्थिक उलाढाल (2012) | $११.५ कोटी[१] | ||
Sources: AIP Saudi Arabia |
किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملك عبدالعزيز الدولي) (आहसंवि: JED, आप्रविको: OEJN) हा सौदी अरेबियाच्या जेद्दा शहराजवळील विमानतळ आहे. सौदी अरेबियाचा भूतपूर्व राजा अब्दुल अजीज अल-सौद ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. हा आकाराने सौदी अरेबियामधील तिसऱ्या क्रमांकाचा तर प्रवासी संख्येमध्ये सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. मुस्लिम धर्मीयांचे मक्का हे तीर्थक्षेत्र येथून जवळ असल्याने अब्दुल अजीज विमानतळावर हज यात्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी ८०,००० क्षमतेचे वेगळे टर्मिनल बांधण्यात आले आहे. मक्का व मदीना शहरांना जोडणारा ४५३ किमी लांबीचा मक्का-मदीना द्रुतगती रेल्वेमार्ग ह्या विमानतळावरूनच धावतो.
एका अहवालानुसार अब्दुल अजीज विमानतळ हा एकेकाळी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वाईट विमानतळ होता.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "King Abdulaziz International airport – Economic and social impact". Ecquants. 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 September 2013 रोजी पाहिले.
- ^ "Worst Airports of 2014". 2015-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-12 रोजी पाहिले.