Jump to content

कालिनिनग्राद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कालिनिनग्राड या पानावरून पुनर्निर्देशित)
कालिनिनग्राद
Калининград
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
कालिनिनग्राद is located in युरोपियन रशिया
कालिनिनग्राद
कालिनिनग्राद
कालिनिनग्रादचे युरोपियन रशियामधील स्थान

गुणक: 54°53′N 20°29′E / 54.883°N 20.483°E / 54.883; 20.483

देश रशिया ध्वज रशिया
विभाग कालिनिनग्राद ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १२५५
क्षेत्रफळ २२४.७ चौ. किमी (८६.८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ४,४१,३७६
  - घनता २,८६६ /चौ. किमी (७,४२० /चौ. मैल)
  - महानगर ६,९०,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
अधिकृत संकेतस्थळ


कालिनिनग्राद (रशियन: Калининград; जुने नाव: क्योनिग्जबर्ग, जर्मन: Königsberg; रशियन: Кёнигсберг; लिथुएनियन: Karaliaučius; पोलिश: Królewiec) हे रशिया देशाच्या कालिनिनग्राद ओब्लास्ताचे मुख्यालय व बाल्टिक समुद्रावरील एक मोठे बंदर आहे. कालिनिनग्राद ओब्लास्त हे पोलंडलिथुएनिया ह्यांच्या दरम्यान वसलेले रशियाचे एकमेव बहिःक्षेत्र आहे जे संलग्न रशियन भूभागापासून वेगळे आहे.

इ.स. १२५५ साली क्रुसेड दरम्यान सध्याच्या कालिनिनग्राद भागामध्ये एक मोठा किल्ला बांधला गेला व ह्या शहराचे नाव क्योनिग्जबर्ग असे ठेवण्यात आले. त्यानंतरच्या काळात ह्या शहरावर पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल, रशियन साम्राज्य, प्रशिया, जर्मनी इत्यादी महासत्तांचे अधिपत्य होते. जर्मन साम्राज्यनाझी जर्मनीच्या कार्यकाळात हे शहर पूर्व प्रशिया प्रांतामध्ये होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान क्योनिग्जबर्गची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. १९४५ साली सोव्हिएत लाल सैन्याने ह्या भूभागावर ताबा मिळवला व युद्ध संपल्यानंतर तो सोव्हिएतमध्ये सामील केला गेला. १९४६ साली ह्या शहराचे नाव बदलून कालिनिनग्राद असे ठेवण्यात आले.

२०१८ फिफा विश्वचषकाच्या ११ यजमान शहरांपैकी कालिनिनग्राद एक आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: