कार्टव्हील दीर्घिका
कार्टव्हील दीर्घिका | |
---|---|
कार्टव्हील दीर्घिकेचे हबलने घेतलेले छायाचित्र | |
निरीक्षण डेटा (J2000 युग) | |
तारकासमूह | शिल्पकार |
राईट असेंशन | ००h ३७m ४१.१s |
डेक्लिनेशन | −३३° ४२′ ५९″ |
रेडशिफ्ट | ९०५० ± ३ किमी/से[१] |
अंतर (प्रकाशवर्ष) | ५० कोटी प्रकाशवर्ष (१५० मेगापार्सेक)[२] |
प्रकार | S pec (Ring)[१] |
आकार (प्रकाशवर्ष) | ~१,३०,००० प्रकाशवर्षे (व्यास)[२] |
आभासी आकार (V) | १′.१ × ०′.९[१] |
आभासी दृश्यप्रत (V) | १५.२[१] |
इतर नावे | |
पीजीसी २२४८[१], एमसीजी-०६-०२-०२२ए[१] | |
कार्टव्हील दीर्घिका ही ५० कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील शिल्पकार तारकासमूहातील एक मसूराकार दीर्घिका आहे. तिचा व्यास १,५०,००० प्रकाशवर्ष आहे, वस्तूमान २.९–४.८ × १०९ सौर वस्तुमान आहे आणि या दीर्घिकेचा परिवलन वेग २१७ किमी/सेकंद इतका आहे .[३]
१९४१ मध्ये फ्रिट्ज झ्विकी याने या दीर्घिकेचा शोध लावला.[४] झ्विकीने त्याच्या शोधाला सर्वात क्लिष्ट रचनांपैकी एक मानले.[४][५]
या दीर्घिकेच्या आकाराचा अंदाज १,५०,००० प्रकाशवर्ष इतका लागला, जो आकाशगंगेपेक्षा थोडासा जास्त आहे.[६]
रचना
[संपादन]कार्टव्हील दीर्घिकेमध्ये रेडिओ आणि दृश्य वर्णपटामध्ये आरे (स्पोक) दिसतात, पण ते सारखे नाहीत.[७]
उत्क्रांती
[संपादन]ही दीर्घिका एके काळी सर्पिलाकार होती, पण सुमारे २० कोटी वर्षांपूर्वी तिची एका छोट्या दीर्घिकेशी टक्कर झाली.[३][८] जेव्हा जवळील दीर्घिका कार्टव्हील दीर्घिकेतून गेली तेव्हा टक्करीच्या बलामुळे या दीर्घिकेमध्ये अतिशय शक्तिशाली अभिघात लहर (शॉक वेव्ह) निर्माण झाली. अतिशय वेगाने प्रवास करताना या लहरीने वायू व धुळीला बाहेर ढकलले. त्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ताऱ्यांची निर्मिती सुरू झाली. यामुळे केंद्राभोवतीच्या निळ्या कडेचे स्पष्टीकरण मिळते.[९] आपण पाहू शकतो की ही दीर्घिका पुन्हा केंद्रापासून पसरत जाणारे सर्पिलाकार फाटे असलेल्या सामान्य सर्पिलाकार दीर्घिकेचा आकार घेऊ लागली आहे.[८]
क्ष-किरण स्रोत
[संपादन]कार्टव्हील दीर्घिकेचा असामान्य आकार कदाचित चित्रात दिसणाऱ्या छोट्या दीर्घिकेशी झालेल्या टक्करीमुळे निर्माण झाला असावा. या दीर्घिकेच्या बाहेरील कडीला सर्वात अलीकडील स्टार बर्स्टमुळे (स्टार बर्स्ट; प्रचंड दबावाच्या लहरीमुळे होणारी ताऱ्यांची निर्मिती) प्रज्वलित केले आहे. अशा स्टार बर्स्टमुळे होणाऱ्या ताऱ्यांच्या निर्मितीमध्ये अतिशय मोठ्या आणि तेजस्वी ताऱ्यांची निर्मिती होते. जेव्हा अशा जास्त वस्तूमानाच्या ताऱ्यांचा स्फोट होतो तेव्हा न्यूट्रॉन तारे आणि कृष्णविवरांची निर्मिती होते. यापैकी काही न्यूट्रॉन तारे आणि कृष्णविवरांचे जोडीदार तारे असतात ज्यांचे द्रव्य खेचून घेऊन हे क्ष-किरण उत्सर्जित करतात.[१०] सर्वात तेजस्वी क्ष-किरण स्रोत कृष्णविवर आणि त्यांचे जोडीदार तारे असतात जे या दीर्घिकेच्या कडीच्या क्ष-किरणातील छायाचित्रामध्ये पांढऱ्या बिंदूंच्या स्वरूपात दिसतात. कार्टव्हील दीर्घिकेमध्ये अशा द्वैती कृष्णविवर क्ष-किरण स्रोतांची संख्या असामान्यरीत्या जास्त आहे कारण कडीमध्ये अनेक मोठ्या ताऱ्यांची निर्मिती झाली होती.
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d e f "नासा/आयपीएसी एक्स्ट्रागॅलॅक्टीक डेटाबेस (NASA/IPAC Extragalactic Database)". Results for Cartwheel Galaxy. ३० मार्च, २०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b मूर, पॅट्रिक. द डेटा बुक ऑफ ॲस्ट्रॉनॉमी (The Data Book of Astronomy) (इंग्रजी भाषेत). p. ३१८.
- ^ a b Amram P, Mendes de Oliveira C, Boulesteix J, Balkowski C; Mendes De Oliveira; Boulesteix; Balkowski (February 1998). "The Hα kinematic of the Cartwheel galaxy". Astron Astrophys. 330: 881–93. Bibcode:1998A&A...330..881A.CS1 maint: multiple names: authors list (link)
- ^ a b Zwicky F. in Theodore van Karman Anniversary volume Contribution to Applied Mechanics and Related Subjects. Pasadena, California. p. 137.
- ^ Griv E (Oct 2005). "Origin of the Cartwheel Galaxy: disk instability?". Astrophys. Space Sci. 299 (4): 371–85. Bibcode:2005Ap&SS.299..371G. doi:10.1007/s10509-005-3423-5.[permanent dead link]
- ^ "अमेझिंग स्पेस- फास्ट फॅक्ट्स: कार्टव्हील गॅलॅक्सी (Amazing Space- Fast Facts: Cartwheel Galaxy)". 2009-07-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ Mayya YD; et al. (2005). "The Discovery of Spiral Arms in the Starburst Galaxy M82". Ap J. 628 (1): L33. arXiv:astro-ph/0506275. Bibcode:2005ApJ...628L..33M. doi:10.1086/432644.
- ^ a b "Cartwheel Galaxy". College of Southern Nevada. 2009-07-03 रोजी पाहिले.
- ^ जेन प्लॅट. "कार्टव्हील गॅलॅक्सी मेक्स वेव्ह इन न्यू नासा इमेज (Cartwheel Galaxy Makes Waves in New NASA Image)". 2014-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-15 रोजी पाहिले.
- ^ "द कार्टव्हील गॅलॅक्सी - इंट्रोडक्शन (The Cartwheel Galaxy - Introduction)". July 29, 2013 रोजी पाहिले.