ऑड्री हेपबर्न

ऑड्री हेपबर्न (जन्म : ४ मे, इ.स. १९२९; मृत्यू :. - २० जानेवारी, इ.स. १९९३) ही एक ब्रिटिश अभिनेत्री, नर्तक आणि मानवतावादी स्त्री होती. चित्रपट आणि फॅशन तारा म्हणून ओळखली जाणारी हेपबर्न हॉलिवूडच्या सोनेरी काळात सक्रिय होती. अमेरिकन चित्रपट संस्थेने तिला हॉलिवूडच्या सोनेरी काळातील तृतीय सर्वोत्तम स्त्री कलाकार म्हणून सन्मानित केले आहे. हिचे मूळ नाव ऑड्री कॅथलीन रस्टन होते.
ब्रसेल्स, बेल्जियम येथे जन्मलेल्या ऑड्रीचे बालपण बेल्जियम इंग्लंड व नेदरलॅंडस येथे व्यतीत झाले.
ऑड्री हेपबर्नविषयक पुस्तके[संपादन]
- मृगनयनी मनस्विनी ऑड्री हेपबर्न (मूळ पुस्तक मून रिव्हर : ऑड्री हेपबर्न, मूळ इंग्रजी लेखक - शॉन हेपबर्न, मराठी अनुवाद - डॉ. विनीता महाजनी, पद्मगंधा प्रकाशन)