Jump to content

दहशतवाद विरोधी पथक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए.टी.एस. या पानावरून पुनर्निर्देशित)

दहशतवाद विरोधी पथक (लघुरुप: एटीएस) हे भारतातील महाराष्ट्र, गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश , राजस्थान, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल सह अनेक राज्यांमध्ये एक विशेष पोलीस दल आहे.[] महाराष्ट्रात याचे प्रमुख भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ असतात.[] या पथकाने देशातील अनेक दहशतवादी हल्ले रोखले आहेत. दहशतवादाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या विभागाची स्थापनी केली आहे. महाराष्ट्राच्या एखाद्या भागात चालू असलेली आतंकवादी, राष्ट्रद्रोही कृतीची माहिती गोळा करण्याचे आणि त्यानुसार कारवाई करण्याचे काम हा विभाग करतो. हा विभाग अन्य राज्यांतील दहशतवादविरोधी विभागांशी देखील संपर्क साधून असतो. याशिवाय इंटेलिजन्स ब्युरो अर्थात 'आयबी', संशोधन आणि विश्लेषण विभाग अर्थात 'रॉ' आदी केंद्रीय यंत्रणांशी देखील संपर्क साधून असतो.[]

विविध ज्ञात-अज्ञात दहशतवादी गट, माफिया तसेच अन्य संघटित गुन्हेगारी यंत्रणा तसेच बनावट चलन आणि अमली पदार्थांच्या तस्करीची माहिती गोळा करणे, त्यांच्यावर माग ठेवणे आणि त्यांच्या कारवाया हाणून पाडण्याचे उद्दिष्ट एटीएसपुढे असते.

महाराष्ट्रात ए.टी.एस.ची स्थापना १९९० मध्ये मुंबईचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त आफताब अहमद खान यांनी केली होती, जे ए.ए. खान या नावाने प्रसिद्ध होते. आधुनिक काळातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी लॉस एंजेलस पोलीस विभागाच्या स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स (SWAT) टीमच्या पद्धतींपासून त्याला प्रेरणा मिळाली.[] १९९० मध्ये स्थापन झाल्यापासून, ए.टी.एस.च्या अधिकाऱ्यांनी २३ शौर्य पुरस्कार जिंकले आहेत. मुंबई एटीएस २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई, महाराष्ट्रातील ५ तारांकित हॉटेल्स ताजमहाल हॉटेल आणि ओबेरॉय ट्रायडेंटसह अनेक ठिकाणी ओलिसांच्या सुटकेच्या मोहिमेत सामील होती.

मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ए.टी.एस.ची निर्मिती महाराष्ट्र सरकारने, GR क्रमांक SAS-10/03/15/SB-IV, दिनांक 8 जुलै 2004 द्वारे केली होती. एटीएसची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत:[]

  • महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात कार्यरत असलेल्या देशद्रोही घटकांची माहिती मिळवणे
  • आयबी आणि रॉ सारख्या केंद्रीय माहिती संस्थांशी समन्वय साधणे आणि त्यांच्याशी माहितीची देवाणघेवाण करणे
  • इतर राज्यांतील तत्सम एजन्सींशी समन्वय साधणे
  • माफिया, गुंड आणि इतर संघटित गुन्हेगारी सिंडिकेटच्या क्रियाकलापांचा मागोवा घेणे आणि त्यांना दूर करणे
  • बनावट नोटांचे रॅकेट आणि अंमली पदार्थांची तस्करी शोधण्यासाठी

शाखा

[संपादन]

भारतातील अनेक राज्यांनी आपापल्या पोलिस दलांमध्ये एटीएस च्या पुढीप्रमाणे शाखा स्थापन केल्या आहेत.-

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "Sarat Kumar appointed as Bihar ATS Chief". Biharprabha News. 24 November 2013. 24 November 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Maharashtra ATS gets new chief" The Hindu, 2015
  3. ^ "The Anti-Terrorism Squad: Unsung Heroes of Indian Counter-Terrorism". 28 December 2015.[permanent dead link]
  4. ^ "ANTI – TERRORISM SQUAD" mumbaipolice.maharashtra.gov.in retrieved on 23 January 2019
  5. ^ Leena Misra (2003-07-22). "ATS to branch out to other cities in state – Ahmedabad – City". द टाइम्स ऑफ इंडिया. 2012-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-26 रोजी पाहिले.Leena Misra (22 July 2003). . The Times of India. Archived from the original Archived 2012-10-23 at the Wayback Machine. on 23 October 2012. Retrieved 26 July 2010.

बाह्य दुवे

[संपादन]