इंटेलिजन्स ब्युरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg


इंटेलिजन्स ब्युरो (हिंदी:खुफिया विभाग) ही भारतातील गुप्तचर संघटना आहे.

इतिहास[संपादन]

या संघटनेची सुरुवात इंटेलिजन्स डिपार्टमेंट नावाने १८८५ साली झाली. भारताचे तत्कालीन क्वार्टरमास्टर जनरल चार्ल्स मॅकग्रेगोर यांनी अफगाणिस्तानमधील रशियाच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी हा विभाग सुरू केला होता. १९०९मध्ये इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स ऑफिस या नावाने ओळखल्या गेलेल्या संघटनेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकाऱ्यांवर टेहळणी करण्याचे काम केले. १९२१मध्ये यास इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स असे नाव दिले गेले. हा विभाग इंडिया ऑफिस आणि ब्रिटिश भारत सरकार हे संयुक्तपणे चालवित असत आणि स्कॉटलंड यार्ड आणि एमआय५शी संधान बांधून असत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.