ऑबेरॉय ट्रायडेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओबेरॉय ट्रायडेंट, मुंबई.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


ऑबेरॉय ट्रायडेंट भारतातील हॉटेलसाखळी आहे. भारतामधील काही शहरांमध्ये आणि जगामध्ये ऑबेराय समूहाच्या मालकीची हॉटेल्स आणि रिझोर्ट्स असून ऑबेराय आणि ट्रायडेंट ही दोन वेगवेगळी पंचतारांकित हॉटेल त्यांच्याकडून चालविली जातात. एकाच ठिकाणी ही दोन हॉटेल एकत्र असतात तेव्हा त्या समूहाला ऑबेराय ट्रायडेंट असे म्हणतात.

सुरुवातीच्या काळात ऑबेरॉय टॉवर्स किंवा ऑबेराय शॅरोटन या नावाने ही हॉटेल्स ओळखली जात होती. २००४ पासून एप्रिल २००८ च्या दरम्यान हिल्टन हॉटेल्स कॉर्पोरेशन आणि ऑबेरॉय हॉटेल व रिझोर्ट यांच्यामध्ये करार झाल्यावर ही हॉटेल्स हिल्टन हॉटेल्स म्हणून ओळखली जात होती. एप्रिल २००८ पासून ही हॉटेल्स ट्रायडेंट टॉवर्स म्हणून ओळखले जाते.[१]

ऑबेरॉय हॉटेल आणि रिझॉर्ट्स आणि ट्रायडेंट हॉटेल मुंबईमध्ये नरीमन पॉइंट येथे असून ते ऑबेरॉय, मुंबई आणि ट्रायडेंट, नरीमन पॉइंट या नावाने ओळखली जातात. ऑबेराय हॉटेल्स आणि रिझोर्ट्सच्या मालकीची ही दोन्ही हॉटेल असून त्यांच्याकडून चालविली जातात. या दोनही हॉटेलच्या वेगवेगळया इमारती असून दोन्ही इमारती एका सामायिक रस्त्यानी जोडलेल्या आहेत. [२]

मालकी[संपादन]

पी.आर.एस. ऑबेराय या ऑबेराय कुटुंबातील सर्वांत वयोवृध्द असणा-या गृहस्थाकडे इआयएच लिमिटेड या कंपनीमधील ३२.११ टक्के भाग आहे. आयटीसी लिमिटेडचे १४.९८ टक्के भाग इआयएच लिमिटेड मध्ये गुंतलेले आहेत. परंतू काही ठराविक काळानंतर आयटीसी लिमिटेडचे १५ टक्के भाग असून ऑबेराय कुटुंबाने इआयएच लिमिटेड कंपनीमधील १४.१२ टक्के भाग मुकेश अंबानीच्या रिलायन्स्‍ इंडस्ट्रीज इनवेस्टमेंट आणि होल्डींग प्रा.लि. यांच्या नांवे केलेले आहेत. ३० ऑगस्ट, २०१० रोजी रु.१०२१ करोड किंमतीचा हा करार झाला असून नुकताच रीलायन्स इंडस्ट्रीजचा भाग २० टककयांपर्यंत वाढविलेला आहे.

नोव्हेंबर २००८ चा दहशतवादी हल्ला[संपादन]

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी ऑबेराय , मुंबई आणि ट्रायडेंट, नरीमन पॉइंट ही हॉटेलस दहशतवादयांनी कब्ज्यात घेउुन हॉटेलमधील पर्यटकांना ओलीस धरले होते. ३ दिवस चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये ३२ कर्मचारी आणि पर्यटक मारले गेले होते.[३]

हॉटेल्स ची यादी[संपादन]

ऑबेराय हॉटेल्स आणि रीझोर्टस[संपादन]

भारतामधील :-[संपादन]

 • द ऑबेराय, न्यू दिल्ली
 • द ऑबेराय, बंगलोर
 • द ऑबेराय ग्रॅड, कोलकत्ता
 • द ऑबेराय, मुंबई
 • द ऑबेराय अमरविलास, आग्रा
 • द ऑबेराय राजविलास, जयपूर
 • द ऑबेराय उदयविलास, उदयपूर (चौथ्या क्रमांकाचे जगातील सर्वोत्तम हॉटेल)
 • वाइल्डफलॉवर हॉल, हिमालयातील सिमला
 • द ऑबेराय सेसील, सिमला
 • द ऑबेराय, मोटर वेसल वृंद, बॅकवॉटर क्रुसर, केरळ
 • द ऑबेराय वन्यविलास, रणथंबोर
 • द ऑबेराय, गुरगाव

इंडोनेशियामधील[संपादन]

 • द ऑबेराय, बाली
 • द ऑबेराय, लंबोक

मॉरीशसमधील[संपादन]

 • द ऑबेराय, मॉरीशस

इजिप्तमधील[संपादन]

 • द ऑबेराय, सहल हशिश, रेड सी
 • द ऑबेराय झाहरा, लक्झरी नाईल क्रुसर
 • द ऑबेराय फिले, नाईल क्रुसर

सौदी अरेबियामधील[संपादन]

 • द ऑबेराय, दुबई

ट्रायडेंट हॉटेल्स[संपादन]

भारतामधील[संपादन]

 • ट्रायडेंट, आग्रा
 • ट्रायडेंट, भुवनेश्वर
 • ट्रायडेंट, चेन्नई
 • ट्रायडेंट, कोईमतूर (बांधकाम चालू आहे)
 • ट्रायडेंट, कोचीन
 • ट्रायडेंट, गुरगांव
 • ट्रायडेंट,जयपूर
 • ट्रायडेंट, बांद्रा कुर्ला, मुंबई
 • ट्रायडेंट, नरीमन पॉइंट, मुंबई
 • ट्रायडेंट, उदयपूर

भारतामधील इतर समूहाची हॉटेल[संपादन]

 • क्लार्कस हॉटेल, सिमला
 • मेडेनस हॉटेल, दिल्ली

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ "हिल्टन मुंबई वरून ट्रायडेंट टॉवर्स असे नामांतर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
 2. ^ "ऑबेराय ट्रायडेंट हॉटेल चे मुंबईमधील स्थान" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
 3. ^ रायस, ब्लॅकली. "अतिश्रीमंतांसाठी उच्च अभिरुचीचे हॉटेल शहरात साकार, लंडन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: