Jump to content

एहूद ओल्मर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एहूद ओल्मर्ट

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
१४ एप्रिल २००६  ३१ मार्च २००९
मागील एरियेल शॅरन
पुढील बिन्यामिन नेतान्याहू

कार्यकाळ
१९९३  २००३

जन्म ३० सप्टेंबर, १९४५ (1945-09-30) (वय: ८०)
बिन्यामिना, हैफा जिल्हा, ब्रिटिश पॅलेस्टाइन
पत्नी अलिझा ओल्मर्ट
धर्म ज्यू

एहूद ओल्मर्ट (हिब्रू: אהוד אולמרט; ३० सप्टेंबर १९४५) हा इस्रायल देशामधील एक राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे. इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेला ओल्मर्ट एरियेल शॅरनच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होता. ४ जानेवारी २००६ रोजी पंतप्रधान असताना शॅरनला पक्षाघात झाल्यामुळे तो कोमामध्ये गेला व त्याच्या जागी कार्यवाहू पंतप्रधान म्हणून ओल्मर्टची निवड झाली. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुका ओल्मर्टच्या पक्षाने जिंकल्या व ओल्मर्ट इस्रायलचा १२वा पंतप्रधान बनला.

३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ओल्मर्टने मार्च २००९ मध्ये पंतप्रधानपद सोडले. सत्तेवर असताना भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर खटला भरला गेला होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: