Jump to content

बिन्यामिन नेतान्याहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिन्यामिन नेतान्याहू

इस्रायलचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
३१ मार्च २००९
राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेझ
रेउव्हेन रिव्हलिन
मागील एहूद ओल्मर्ट
कार्यकाळ
१८ जून १९९६ – ६ जुलै १९९९
मागील शिमॉन पेरेझ
पुढील एहूद बराक

जन्म २१ ऑक्टोबर, १९४९ (1949-10-21) (वय: ७४)
तेल अवीव, इस्रायल
गुरुकुल मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
धर्म ज्यू
सही बिन्यामिन नेतान्याहूयांची सही

बिन्यामिन नेतान्याहू (मराठी नामभेद: बेंजामिन नेतान्याहू ; हिब्रू: בִּנְיָמִין "בִּיבִּי" נְתַנְיָהוּ ; रोमन लिपी: Benjamin Netanyahu; २१ ऑक्टोबर, इ.स. १९४९) हे इस्रायल देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. तत्पूर्वी जून, इ.स. १९९६ ते जुलै, इ.स. १९९९ या कालखंडातही त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळली. हे लिकुड पक्षाचा विद्यमान अध्यक्ष आहेत.

बिन्यामिन नेतान्याहू हे इज्राइलचे प्रथम पंतप्रधान आहेत, ज्यांचा जन्म देशाची स्थापना झाल्यावर झाला. त्यांचे बालपण जेरुसलेम मध्ये गेले. नेतान्याहू यांना 'बीबी' या टोपण नावाने ओळखले जाते. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांनी निवृत्ती घेतली होती, २००२ साली परत त्यांनी परराष्ट्रीय मंत्री म्हणून धुरा सांभाळली.

जीवन

[संपादन]

नेतण्याहूंचा जन्म 'तेल अविव' ,इजराईल येथे १९४९ मध्ये झाला. त्यांची आई ताजीला सेगल व बाबा बेंजीअण नेतण्याहूं आहे.बेंजीमिन यांच्या जन्मा पूर्वीपासून मोठे दोन भावंड होते. त्यांचे बालपणी थोड शिक्षण जेरुसेलम हेनरिएट्टा सजोल्ड् एलिमेंटरी स्कूल येथे झाले. त्यांचे शाळेतील शिक्षक सांगतात की ते शाळेत असताना शिस्तीने वागत,ते नम्र आणि धाळशी होते.१९५६ ते १९५८ आणि पुन्हा १९६३ ते १९६७ बेंजिमिन नेतण्याहू यांचां परिवार संयुक्त राज्य अमेरिकेत चेलतेन्हाम भागात ,पेंसलवेनिया , आणि फिलाडेल्फिया येथे राहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "इस्रायली पंतप्रधानांचा करिक्युलम व्हीटे (इंग्लिश आवृत्ती)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "बिन्यामिन नेतान्याहू अधिकृत संकेतस्थळ" (हिब्रू and रशियन व इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ

[संपादन]