Jump to content

एलेन बर्स्टिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलेन बर्स्टिन
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावEllen Burstyn संपादन
जन्म-नावEdna Rae Gillooly संपादन
दिलेले नावEllen संपादन
आडनावBurstyn संपादन
जन्म तारीख७ डिसेंबर 1932 संपादन
जन्मस्थानडेट्रॉईट संपादन
वैवाहिक जोडीदारNeil Nephew संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
पदPresident of Actors Equity Association संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाCass Technical High School, Lee Strasberg Theatre and Film Institute संपादन
चे शिष्यली स्ट्रासबर्ग संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1955 संपादन
Lifestyleveganism संपादन
धर्मसूफी पंथ संपादन
सदस्यताjury at the Berlin International Film Festival, jury at the Cannes Festival संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://ellenburstyn.net/ संपादन

एलेन बर्स्टिन (जन्म एडना राय गिलूली; ७ डिसेंबर १९३२) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. ही नाटकांमधील गुंतागुंतीच्या महिलांच्या चित्रणासाठी ओळखली जाते. तिला अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार आणि दोन प्राइमटाइम एमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ह्यामुळे ती अभिनयाचा तिहेरी मुकुट प्राप्त करणाऱ्या काही कलाकारांपैकी एक बनली आहे. तिला बाफ्टा पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील मिळाले आहे.

बर्स्टिनने १९५७ मध्ये ब्रॉडवेवर फेअर गेम मधून अभिनयात पदार्पण केले. सेम टाइम, नेक्सट यीअर या नाटकातील कामासाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला. मार्टिन स्कॉर्सेसच्या ॲलिस डजंट लिव्ह हिअर एनमोर (१९७४) मधील विधवा ॲलिस हयातच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. द लास्ट पिक्चर शो (१९७१), द एक्सॉर्सिस्ट (१९७३), सेम टाईम, नेक्स्ट यीअर (१९७८), रीसरेक्शन (१९८०), आणि रिक्वेम फॉर अ ड्रीम (२०००) मध्ये तिच्या इतर ऑस्कर-नामांकित भूमिका होत्या. हॅरी अँड टोंटो (१९७४), हाऊ टू मेक एन अमेरिकन क्विल्ट (१९९५), डब्ल्यू. (२००८), इंटरस्टेलर (२०१४), द एज ऑफ ॲडलाइन (१९९५) आणि पिसेस ऑफ अ वुमन (२०२०) या तिच्या इतर उल्लेखनीय चित्रपट भूमिकांचा समावेश आहे.

तिने एनबीसीवरील कायदेशीर नाटक लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट (२००९) मध्ये पाहुणी भूमिके केली ज्यासाठी तिने सहाय्यक भूमिकेसाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कार जिंकला. २०१३ मध्ये हा पुरस्कार तिने परत जिंकला मिनिसिरीज पॉलिटिकल ॲनिमल्स मधील तिच्या कामासाठी. तिच्या इतर एमी-नामांकित भूमिकांमध्ये पॅक ऑफ लाइज (१९८८), मिसेस हॅरिस (२००५), बिग लव्ह (२००८), फ्लॉवर्स इन द ॲटिक (२०१४), आणि हाउस ऑफ कार्ड्स (२०१६) यांचा समावेश आहे. २००० पासून, ती ॲक्टर्स स्टुडिओ, न्यू यॉर्क शहरातील ड्रामा स्कूलची सह-अध्यक्ष आहे. २०१३ मध्ये, तिला तिच्या नाटलातील कामासाठी अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

बर्स्टीनने १९५० मध्ये बिल अलेक्झांडरशी लग्न केले आणि १९५७ मध्ये घटस्फोट घेतला. पुढच्या वर्षी, तिने पॉल रॉबर्ट्सशी लग्न केले, ज्यांच्यासोबत तिने १९६१ मध्ये जेफरसन नावाचा मुलगा दत्तक घेतला. त्याच वर्षी या जोडप्याचा घटस्फोट झाला.[] १९६४ मध्ये, तिने अभिनेता नील नेफ्यूशी लग्न केले, ज्याने नंतर त्याचे नाव बदलून नील बर्स्टिन केले. तिने नील बर्स्टिनचे वर्णन "मोहक आणि मजेदार आणि तेजस्वी आणि प्रतिभावान आणि विक्षिप्त" असे केले, परंतु स्किझोफ्रेनियाने त्याला हिंसक बनवले आणि शेवटी त्याने तिला सोडले.[] १९७२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिच्या आत्मचरित्रात, "लेसन्स इन बिकमिंग मायसेल्फ", बर्स्टिनने उघड केले की घटस्फोटानंतर नीलने सहा वर्षे तिचा पाठलाग केला होता आणि एकदा विवाहित असताना तिच्यावर बलात्कार केला होता. कोणतेही आरोप दाखल करण्यात आले नाहीत, कारण पती-पत्नीवरील बलात्कार हा अद्याप गुन्हा नव्हता. १९७८ मध्ये त्याने मॅनहॅटनच्या नवव्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली.[]

बर्स्टिनचे पालनपोषण कॅथोलिक परंपरेत झाले होते, परंतु आता ती स्वतःला सर्व धार्मिक विश्वासांशी संलग्न करते.[] ती सुफीवादाचे अनुसरण करते आणि येशू, गणपती, गुआन यिन यांची प्रार्थना करते.[]

ती डेमोक्रॅटिक पक्षाची समर्थक आहे.[] तिने १९८२ ते १९८५ पर्यंत ॲक्टर्स इक्विटी असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून काम केले.[] १९९७ मध्ये, तिला मिशिगन महिला हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. [] २००० पासून, ती अल पचिनो आणि ॲलेक बाल्डविन यांच्यासोबत ॲक्टर्स स्टुडिओची सह-अध्यक्ष आहे.[] २०१३ मध्ये, तिला स्टेजवरील कामासाठी अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. [१०]

संदर्भ

[संपादन]
  1. "Timeline—A Chronology of Key Events from Lessons in Becoming Myself". March 7, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 4, 2013 रोजी पाहिले.
  2. "Becoming Yourself". Oprah.com (इंग्रजी भाषेत). 2020-03-07 रोजी पाहिले.
  3. (December 1, 2006).Ellen Burstyn—Burstyn Feared Death as Abusive Husband Stalked Her" Archived 2008-10-10 at the वेबॅक मशीन.. contactmusic.com. Retrieved December 20, 2009.
  4. Winsor, Ben. "9 Famous Americans You Probably Didn't Know Were Muslim". Business Insider. 2020-04-11 रोजी पाहिले.
  5. "Ellen Burstyn's True Face". Beliefnet. 2006. January 5, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 4, 2013 रोजी पाहिले.
  6. Utichi, Joe (2016-05-19). "Ellen Burstyn On 'House Of Cards' And The Presidential Race: "I'm Just Stunned"". Deadline (इंग्रजी भाषेत). November 8, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-03-07 रोजी पाहिले.
  7. "How I Got My Equity Card". Actors' Equity Association. October 21, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 4, 2013 रोजी पाहिले.
  8. "Ellen Burstyn: Michigan's Women's Hall of Fame". michiganwomen.org. September 14, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 4, 2013 रोजी पाहिले.
  9. "Leadership". The Official Site of The Actors Studio (इंग्रजी भाषेत). December 31, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-03-07 रोजी पाहिले.
  10. Rickwald, Bethany (2014-01-10). "Whoopi Goldberg to Host the 30th Annual Musical Celebration of Broadway Honoring Neil Patrick Harris | TheaterMania". www.theatermania.com (इंग्रजी भाषेत). February 17, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-03-07 रोजी पाहिले.