एचएमटी सोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एचएमटी सोना ही भारतात पिकणार्‍या तांदुळाची एक जात आहे. हिचा शोध चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या छोट्या गावातील दादाजी खोब्रागडे यांनी लावला.[१][२]


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


दादाजींनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आजारपणाच्या खर्चासाठी आपली तीन एकर भाताची शेती विकली. सुनेच्या वडिलांनी मुलीच्या नावाने दिलेल्या दीड एकर शेतीवरती घरातल्या सहा जणांचा चरितार्थ चालविणे अवघड होते. बरा होऊनही चालू फिरू न शकणारा मुलगा असल्याने घर चालविण्याबरोबरच नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी दादाजी आपली शेती सांभाळून दुसर्‍याच्या शेतीवर मजुरी करू लागले. लौकिक अर्थाने शेतीतज्ज्ञ नसणार्‍या दादाजींनी आपल्या शेतात हेक्टरी ३५-४० क्विंटल धानाचे उत्पन्‍न घेतले.

इ.स. १९८३ साली दादाजींनी शेतात ’पटेल ३’ या जातीच्या धानाची लागवड केली. पिकाचे सूक्ष्म निरीक्षण कराताना त्यांनी धानाच्या तीन रोपांच्या पांढर्‍या लोंबीवर पिवळे ठिपके दिसले. या तीन रोपांचे बी वेगळे काढून त्यांनी पुढील हंगामात त्याच बियांची पेरणी केली. हे धानाचे पीक आवडल्याने दादाजींनी त्याचेच बीजगुणन चालू ठेवले. आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी ते आवडल्याने मागून नेले आणि काही वर्षांतच सर्वमान्य झाले. धानाच्या त्या जातीला त्याकाळी लोकप्रिय असलेल्या ’एचएमटी सोना’ या घड्याळ्याचे नाव देण्यात आले.

धानाच्या या एचएमटी सोना जातीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातले ते नागभीड गाव आणि दादाजी खोब्रागडे यांना राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले. या धानाच्या संशोधनासाठी दादाजींना राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपयांचे पारितषिक मिळाले.

अधिक माहिती[संपादन]

एचएमटी सोना ही वजनाला हलका असलेल्या सुवासिक तांदळाची जात आहे. भारतात पिकणार्‍या या उच्च प्रतीच्या तांदुळाची प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्वेतील देशांकडे निर्यात होते.

आंध्र प्रदेशात कृष्णा, गुंटूर, कर्नूल, महबूबनगर निझामाबाद, नेल्लोर, वरंगळ आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांत, कर्नाटकातील रायचूर, कोप्पल आणि बेल्लारी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात या तांदुळाचे उत्पादन घेतले जाते.

तांदुळाच्या जाती[संपादन]

एकेकाळी महाराष्ट्रात विविध चवींच्या आणि विविध गुणदोषांच्या अनेक जातींचे तांदूळ पेरले जात. रासायनिक खते आणि जंतुनाशकांच्या सवंग वापराने, सरकारच्या आणि शेतकर्‍यांच्या अनास्थेने अनेक जाती लुप्तप्राय झाल्या, अनेक जातींच्या तांदुळाच्या भाताची चव बदलली. पुण्याच्या जवळपास भोर, नसरापूर आणि कामशेट येथे पिकणारा सुवासिक आंबेमोहर तांदूळ दिसेनासा झाला. या तांदुळाची जागा सोनरंगी तांदूळ घेईल की काय अशीशंका वाटू लागली आहे.

महाराष्ट्रातील तांदुळाच्या अस्तित्वात असलेल्या किंवा लुप्तप्राय झालेल्या जाती

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "संशोधनाचे भरघोस पीक" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. २६ सप्टेंबर २०१३. १६ सप्टेंबर २०१४ रोजी पाहिले. 
  2. ^ श्रीपाद अपराजित (२० जुलै २०१०). "दुर्लक्षित दादाजींची व्यथा ऐकणार कोण?" (मराठी मजकूर). सकाळ. १६ सप्टेंबर २०१४ रोजी पाहिले.