दादाजी खोब्रागडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दादाजी रामाजी खोब्रागडे
मृत्यू ३ जून इ.स. २०१८

दादाजी रामाजी खोब्रागडे(जन्म:नागभीड, मृत्यू: ३ जून २०१८, चंद्रपूर) हे भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढणारे एक कृषी संशोधक होते.

केवळ इयत्ता तिसरी पर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते.१९८३ पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरूवात केली.सहा वर्षांच्या बीजगुणनाच्या प्रयोगानंतर ते नवीन वाण तयार करण्यात यशस्वी झाले. या वाणाला काय नाव द्यायचे, हे न सुचल्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या एच.एम.टी. कंपनीच्या एच.एम.टी.सोना घड्याळावरून तेच नाव या वाणाला दिले.पुढे कृषी विद्यापीठाने त्यांना श्रेय न देता हे वाण बाजारात आणले.

खोब्रागडे यांनी केलेल्या संशोधनाच्या जोरावर अनेक बियाणे कंपन्यांनी पैसे मिळवले.ते मात्र हलाखीचे जीवन जगत राहिले. त्यांच्या अखेरच्या आजारपणात शेतकऱ्यांनी पैसे गोळा करून उपचाराचा

खर्च केला.डॉ.अभय बंग यांनी शोधग्राममध्ये उपचारांची सोय केली. इथेच खोब्रागडे यांचा मृत्यू झाला.[१]


खोब्रागडे यांनी शोधलेले भाताचे वाण[संपादन]

खोब्रागडे यांनी भाताचे एकूण नऊ वाण शोधले:

[२]

[३]

 1. एच.एम.टी. सोना
 2. नांदेड हिरा
 3. नांदेड चेन्नूर
 4. विजय नांदेड
 5. नांदेड ९२
 6. डीआरके
 7. नांदेड दीपक
 8. काटे एच.एम.टी.
 9. डीआरके-२

पुरस्कार[संपादन]

बाह्य चित्रफित
https://vimeo.com/127400150
 1. तांदळाच्या बाबतीतील संशोधनाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून २००६ मध्ये कृषिभूषण पुरस्कार.
 2. २०१० मध्ये फोर्ब्सच्या यादीत नाव.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "दादाजी खोब्रागडे". दैनिक लोकसत्ता. १५ जून २०१८ रोजी पाहिले. 
 2. ^ गावंडे, देवेंद्र (११ जून २०१८). "लोकसत्ता". लोकसत्ता. ११ जून २०१८ रोजी पाहिले. 
 3. ^ खोब्रागडे, मित्रदीप. "भातवाणातील संशोधकाला शासनाने सोडले वाऱ्यावर". सकाळ ॲग्रोवन. सकाळ. 18 जून 2018 रोजी पाहिले.