भाद्रपद शुद्ध पंचमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऋषीपंचमी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

भाद्रपद शुद्ध पंचमी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.


हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे, भाद्रपद शुद्ध पंचमी हे स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकुण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागचा संकेत वा संदेश आहे. अशा रितीने ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी ही ऋषिपंचमी आहे.

आशय व महत्व[संपादन]

गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची मुख्य योजना मुख्यत: आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असतो.स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर निरसन होऊ शकते.ज्या विद्यार्थ्याना श्रावणी (वेदाध्ययन करणा-या वर्गासाठी विहित व्रत)संस्काराचा लाभ होत नाही अशा सर्ववर्णीय स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्य कर्मातील त्रुटी व स्खलन यांच्या परिहारासाठी ऋषीपंचमी हे व्रत करावे.[१]

व्रताचार[संपादन]

कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना भौगोलिक वातावरणाचा प्रामुख्याने विचार केलेला असतो.त्यानुसार चातुर्मास काळात येणा-या या ऋषी पंचमी व्रतामध्ये ऋषी पूजनाखेरीज आघाड्याच्या काष्ठाने दंतधावन,पंचगव्य प्राशन,सुवासिनींना हरीद्रास्नान,भस्मस्नान,गोमय स्नान,मृत्तिकास्नान,महासंकलपयुक्त तीर्थस्नान,अर्घ्यदान,अशा अनेक महत्वाच्या विधींचा अंतर्भाव केलेला आहे.ऋषी पंचमीच्या दिवशी विशिष्ट व्र्ताहार आणि ऋषी स्मरण (सप्तर्षीची पूजा ) या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच्या उपवासाहून पूर्णतया भिन्न आहे.कारण एरवीच्या उपासात रसाहार,फलाहार क्निवा हविष्यान्न विहित असते.परंतु ऋषी पंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले अर्थात, न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थाचे सेवन करणे अभिप्रेत असते.तसेच या व्र्तातील विविध स्नाने सांप्रतकाली लोकप्रिय असणा-या निसर्ग उपचार प्रणाली मध्ये आचरली जातात व त्यापासून होणारे लाभही दिसून येतात.[२]

  1. ^ शास्त्र असे सांगते(पूर्वार्ध) वेदवाणी प्रकाशन
  2. ^ शास्त्र असे सांगते( पूर्वार्ध) वेदवाणी प्रकाशन