षोडशोपचार पूजा
Appearance
(षोडषोपचार पूजा या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय संस्कृतीमध्ये पूजा विधीत सोळा उपचार प्रचलित आहेत. अश्या पूजेला षोडशोपचार पूजा असे म्हणतात.[१]
- सोळा उपचार
- आवाहन - देवदेवतांना पूजेसाठी आमंत्रण करणे.
- आसन - त्यांना स्थानापन्न होण्यासाठी आसन देणे.
- पाद्य - त्यांचे पाय धुणे.
- अर्घ्य - फूल, गंथ, अक्षता आणि पाणी आचमन पळीत एकत्र करून सन्मानपूर्वक अर्पण करणे.
- आचमनीय - देवाला पिण्यासाठी पाणी देणे.
- स्नान - देवदेवतांना अंघोळ घालणे.
- वस्त्र - त्यांना वस्त्र नेसवणे.
- यज्ञोपवीत - देवांना जानवे घालणे.
- अनुलेपन - त्यांच्या कपाळावर गंध लावणे.
- पुष्प - त्यांना फुले वाहणे.
- धूप - त्यांना उदबत्ती ओवाळणे.
- दीप - त्यांना निरांजन ओवाळणे.
- नैवेद्य - त्यांना नैवेद्य दाखविणे.
- नमस्कार - त्यांना वंदन करणे.
- प्रदक्षिणा - देवदेवतांना भोवती फेरी मारणे.
- विसर्जन - मंत्रपुष्पांजली म्हणून पूजाविधी समाप्त करणे.