उषा खंदारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ.उषा खंदारे, एम.ए. एम.एड. पीएच.डी या इंडियन एज्युकेशन सोसायटी चालवत असलेल्या व्ही. एन.स्कूल(दादर, मुंबई)च्या निवृत्त मुख्याध्यापिका, समाज सेविका, लेखिका आणि शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या शालेय जीवनात त्यांना कथालेखन, कविता आणि निबंधलेखनात बक्षिसे मिळत असत. त्या पुढे शाळेत शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका झाल्या.

डॉ. उषा खंदारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षणमंडळाच्या सदस्या आहेत(इ.स.२०१२). त्यांनी महाराष्ट्र राज्य विज्ञानपरिषद व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र यांसंबंधांत समन्वयकाचे काम केले आहे. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या त्या परीक्षक असतात. मराठी पाठपुस्तक अभ्यास मंडळ, शिक्षकांसाठीचे सेवान्तर्गत प्रशिक्षण, अशा विविध मंडळांवर त्यांनी काम केले आहे. उषा खंदारे यांचे शैक्षणिक, विज्ञानविषयक, सामाजिक, सांस्कृतिक, अशा संकीर्ण विषयांवर, वर्तमानपत्रे आणि मासिके यांत अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देण्याच्या उद्देशाने विज्ञानविषयक, ग्रंथसंग्रह, व्यवसाय मार्गदर्शन, लोकसंख्या शिक्षण, इतिहास, स्वातंत्रलढा, भूगोल, आकाश निरीक्षण आदी विषयांवर प्रदर्शने, शिबिरे इत्यादी आयोजित करत असतात.

डॉ. उषा खंदारे यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

 • असं खुलतं व्यक्तिमत्त्व
 • आत्मशोध (काव्यसंग्रह)
 • कविता स्त्री जाणिवेच्या (संपादन)
 • जगण्यातील निखारे (काव्यसंग्रह)
 • महाराष्ट्र भूषण (हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचा परिचय)
 • महाराष्ट्रातील अनमोल रत्ने (व्यक्तिपरिचय)
 • शब्द संपदा कोश
 • शिक्षणातील आव्हाने
 • संवर्धन पर्यावरणाचे
 • स्पंदन मनाचे (काव्यसंग्रह)
 • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (चरित्र)

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

 • विविध संस्थांकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार(एकूण ४)
 • विविध संस्थांकडून उत्कृष्ट मुख्याध्यापिका पुरस्कार(एकूण ५)
 • भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली या संस्थेकडून वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप, सन्मान-प्रशस्तीपत्र
 • मनुष्यबळ विकास लोकसंख्या अकादमी, मुंबई या संस्थेचा महाराष्ट्र गुणीजन रत्‍नगौरव पुरस्कार
 • नवी मुंबई सामाजिक व शैक्षणिक समितीतर्फे सन्मानचिन्ह
 • अनोखा विश्वास संस्था इंदूर यांच्याकडून अहिल्याबाई स्त्रीरत्‍न समाजसेवा पुरस्कार
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा पुरस्कार
 • इंडियन एज्युकेशन सोसायटीतर्फे उत्कृष्ट कामाबद्दल तावडे पुरस्कार, सुवर्णपदक
 • नवहिंद विद्यापीठातर्फे पुरस्कार, सन्मानचिन्ह
 • भारतीय समाज विकास अकादमी, मुंबई यांचा प्राइड ऑफ नेशन पुरस्कार
 • अक्षरमंच, ठाणे यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार
 • युवा जनसेवा प्रतिष्ठान(मुंबई)चा जनगौरव पुरस्कार
 • मैत्री संस्था(मुंबई) कडून देशभूषण पुरस्काररयत महासंघातर्फे वासुदेव बळवंत फडके पुरस्कार
 • संस्कृती आर्ट फाउंडेशन(महाराष्ट्र)चा संस्कृती भूषण पुरस्कार
 • भारतीय समाज विकास अकादमी,नवी दिल्ली या संस्थेतर्फे नॅशनल लेव्हल एक्सलन्स ॲवॉर्ड
 • प्रियदर्शनी फाउंडेशन, मुंबई यांचेकडून प्रियदर्शनी कर्तृत्व गौरव पुरस्कार
 • नॅशनल एज्युकेशन ॲन्ड ह्युमन रि्सोर्स डेव्हलपमेनट ऑर्गनायझेशन,मुंबई या संस्थेतर्फे राष्ट्रीय शिक्षारत्‍न पुरस्कार
 • समता सहयोग संस्था, डोंबिवलीचा समता भूषण पुरस्कार
 • अनेक संस्थांकडून सत्कार, सन्मानचिन्हे वगैरे(२०हून अधिक)