Jump to content

इसवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.

  ?इसवली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लांजा
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/०८

भौगोलिक स्थान

[संपादन]

लांजा बस स्थानकापासून लांजा साटवली रस्त्याने पुढे गेल्यावर पनोरे गावानंतर ३ किमीवर इसवली वसलेले आहे.येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण, हिवाळ्यात शीतल थंड तर पावसाळ्यात समशीतोष्ण असते. पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो परंतु हे टेकडीवर असल्याने व कातळाची जमीन असल्याने पावसाचा निचरा त्वरित होतो आणि पाणी साचून दलदल निर्माण होणे वगैरे गोष्टी घडत नाहीत. येथे फणस, काजू, कोकम,आणि हापूस आंबा ह्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.

लोकजीवन

[संपादन]

मुख्यतः मराठा, कुणबी समाजातील लोक येथे पूर्वीपासून स्थायिक झाले आहेत.भातशेती, नागलीशेती,तसेच पालेभाज्या, फळभाज्या ह्यांचे मोसमात पीक घेतले जाते. कदम आडनावे असलेले लोक येथे आहेत. मुंबई महानगरपालिका येथे काही वर्षांपूर्वी मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या श्रीमती कदम ह्या मूळच्या ह्याच गावच्या रहिवासी आहेत.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

नागरी सुविधा

[संपादन]

लांजा बस स्थानकातून इसवली गावात जाण्यासाठी थेट एसटी बससेवा उपलब्ध आहे.खास ऑटोरिक्क्षाने सुद्धा लांजा वरून येथे जाता येते.लांजा-साटवली एसटी बसने आल्यास साटवली येथे उतरून ४ किमी पायी चालत किंवा सायकलने जाता येते.

जवळपासची गावे

[संपादन]

पन्हाळे,कुवे, निवोशी, बापेरे,रावरी, खानवली, लावगण, भडे, पनोरे, रुण, गोळवशी ही जवळपासची गावे आहेत.इसवली ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[]

संदर्भ

[संपादन]

१. https://www.census2011.co.in/census/state/maharashtra.html

२. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

३. http://tourism.gov.in/

  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/lanja.html