पान सिंग तोमर (चित्रपट)
| शीर्षक | पान सिंह तोमर |
|---|---|
| गट-प्रकार | जीवनचरित्रावर आधारीत चित्रपट, क्रीडापट (चित्रपट श्रेणी) |
| प्रकाशन तारीख | 2010 |
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | हिंदी |
| दिग्दर्शक | तिग्मांशु धूलिया |
| पटकथा | तिग्मांशु धूलिया |
| प्रमुख कलाकार | इरफान खान, माही गिल, Vipin Sharma |
| चित्रीकरण दिग्दर्शक | Aseem Mishra |
| चित्रपट संपादक | Aarti Bajaj |
| संगीतकार | Abhishek Ray |
| निर्माता | Ronnie Screwvala |
| Distributed by | UTV Motion Pictures, नेटफ्लिक्स |
| रंग | color |
| पुरस्कार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट |
| वितरण | video on demand |
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.utvgroup.com/motion-pictures/coming-soon/paan-singh-tomar.html |
पानसिंग तोमर हा २०१० चा भारतीय हिंदी भाषेतील चरित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय सैन्यातील सैनिक आणि सात वेळा राष्ट्रीय स्टीपलचेस विजेता असलेल्या पान सिंग तोमर याच्या जीवनावर आधारित आहे, जो नंतर भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सशस्त्र डाकू बनला.[१][२] या चित्रपटाचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया यांनी केले असून निर्मिती युटीव्ही मोशन पिक्चर्सने केली आहे. इरफान खान याने मुख्य भूमिका साकारली असून माही गिल, विपिन शर्मा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी सहाय्यक भूमिकेत आहेत.
४५ दशलक्ष (US$९,९९,०००) च्या अत्यंत अल्प बजेटमध्ये बनलेल्या[३]
या चित्रपटाचा प्रीमियर २०१० मध्ये लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. दोन वर्षांनंतर, २ मार्च २०१२ रोजी तो देशांतर्गत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरात
२०१.८० दशलक्ष (US$४.४८ दशलक्ष) च्या कमाईसह बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला.[४] या चित्रपटाला ६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.[५]
कथानक
[संपादन]एका समुदायातील नऊ जणांची हत्या केल्यामुळे चर्चेत आलेला डाकू पान सिंग तोमर याची एक वार्ताहर मुलाखत घेतो. तो स्वतःबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना, कथा १९५० सालापासूनच्या 'फ्लॅशबॅक'मध्ये जाते. पानसिंग भारतीय सैन्यात कार्यरत होता, तर त्याची पत्नी आणि आई मुरैना येथे राहत होते. पानसिंगने आपल्या खेळातील कौशल्याने सैन्यातील वरिष्ठांना थक्क केले होते. त्याला सुरुवातीला खेळात रस नव्हता, परंतु क्रीडा विभागात आहारावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे तो त्यात सामील झाला. ५००० मीटर धावण्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असताना, त्याच्या प्रशिक्षकाने त्याला ३००० मीटर स्टीपलचेस (अडथळ्यांची शर्यत) प्रकारात धावण्यासाठी प्रवृत्त केले. त्याने भारतीय राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेतला आणि सलग ७ वर्षे स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १९५८ मध्ये त्याने टोकियो येथील आशियाई खेळांमध्ये भाग घेतला, परंतु केवळ अंतिम फेरीच्या वेळी मिळालेल्या नवीन ट्रॅक स्पाईक्सशी जुळवून घेता न आल्यामुळे त्याचे सुवर्णपदक हुकले. भारत - चीनचे १९६२ मधील युद्ध आणि [[भारत पाकिस्तान मधील १९६५ चे युद्ध या दोन युद्धांमध्ये खेळाडूंना प्रत्यक्ष रणांगणावर जाण्याची परवानगी नसल्यामुळे तो प्रचंड निराश झाला होता. पुढे १९६७ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय लष्करी खेळांमध्ये स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले.
एके दिवशी त्याचा भाऊ त्याला भेटायला आला आणि त्याने भंवरसिंग नावाच्या नातेवाईकाने त्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवल्याची माहिती दिली. सैन्यात प्रशिक्षक पदाची संधी असतानाही पानसिंगने मुदतपूर्व निवृत्ती घेतली आणि कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी तो गावी परतला. घरी आल्यावर त्याने भंवरसिंगशी सामोपचाराने चर्चा करण्याचा प्रयत्न केला, तसेच जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याकडे मदत मागितली, परंतु त्याला यश आले नाही. त्यानंतर भंवरसिंग आणि त्याच्या गुंडांनी पानसिंगच्या मुलाला बेदम मारहाण केली. आपल्या मुलाला या वादातून वाचवण्यासाठी पानसिंगने त्याला सैन्यात भरती होण्यास सांगितले. काही काळाने भंवरसिंग आणि त्याच्या टोळीने पानसिंगच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. यातून कुटुंबातील इतर सदस्य वाचले, परंतु पानसिंगच्या आईची निर्घृण हत्या करण्यात आली. आपल्या आईच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पानसिंगने हातात शस्त्र घेतले आणि तो डाकू झाला. त्याने चंबळ खोऱ्यात धुमाकूळ घातला आणि भंवरसिंगच्या छळाला कंटाळलेल्या लोकांची एक टोळी तयार केली.
पानसिंगने आपल्या टोळीसाठी शस्त्रे आणि पैसा उभा करण्यासाठी श्रीमंत व्यापाऱ्यांचे अपहरण आणि खंडणी वसुली सुरू केली. शस्त्रास्त्रांची रीतसर जुळवाजुळव केल्यानंतर त्याने पोलीस संरक्षण असलेल्या भंवरसिंगवर हल्ला केला. थोड्या पाठलागानंतर पानसिंगने भंवरसिंगला ठार केले. आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला म्हणून पानसिंगने अशा नऊ गावकऱ्यांची हत्या केली ज्यांनी पोलिसांना त्याच्या लपण्याच्या जागेबद्दल माहिती दिली होती. या घटनेमुळे देशपातळीवर आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली. इतर डाकू टोळ्यांनीही त्याला शरण येण्याचे आवाहन केले जेणेकरून पोलिसांची शोधमोहीम थांबेल, परंतु त्याने नकार दिला. येथे वार्ताहराची मुलाखत संपते. ही मुलाखत वर्तमानपत्रात प्रसिद्ध होताच मोठी खळबळ माजली. पोलिसांनी आपला शोध सुरूच ठेवल्याचे पाहून पानसिंगने काही काळ शांत राहण्याचा निर्णय घेतला. तो आपल्या कुटुंबाला आणि लष्करातील जुन्या प्रशिक्षकाला भेटला, ज्यांनी त्याला शरणागती पत्करण्यास सांगितले. पानसिंगने त्यावर उत्तर दिले की, जेव्हा तो राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा खेळाडू होता, तेव्हा अडचणीच्या काळात कोणीही त्याच्या पाठीशी उभे राहिले नाही, आणि जेव्हा त्याने अन्यायाविरुद्ध स्वतःचा लढा सुरू केला, तेव्हा सर्वजण त्याला गुन्हेगार ठरवून अटक करू पाहत आहेत. एका महिन्याच्या विश्रांतीनंतर जेव्हा टोळी पुन्हा एकत्र आली, तेव्हा गपी नावाच्या सदस्याने विश्वासघात करून पोलिसांना त्यांच्या ठाण्यापर्यंत पोहोचवले. या चकमकीत पानसिंगसह त्याच्या टोळीतील सर्व सदस्य मारले गेले. १/२ ऑक्टोबर १९८१ च्या रात्री झालेली ही कारवाई तत्कालीन एसपी रमण, एएसपी ब्रिज लाल हांडा, डीवाय एसपी यशवंत घुराय्या आणि या संपूर्ण मोहिमेचे मुख्य सूत्रधार सर्कल इन्स्पेक्टर महेंद्र प्रताप सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
संदर्भ
[संपादन]- ↑ Mukherjee, Pradipta (13 August 2021). The Fluid Frame in Cinema: Collected Essays. Cambridge Scholars Publishing. pp. 65–66. ISBN 978-1-5275-7377-2. 8 January 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Irrfan's Ability To Bring A Character To Life, In Paan Singh Tomar". 5 May 2021.
- ↑ "Paan Singh Tomar earns Rs. 4.25 crore over weekend". NDTV. IANS. 5 March 2012. 8 January 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Paan Singh Tomar – Movie". Box Office India.
- ↑ "A press conference to announce 59th national film awards will be held" (Press release). Press Information Bureau (PIB), India. 18 March 2013 रोजी पाहिले.