इंदपवाडी
इंदपवाडी
Indapwadi | |
---|---|
गुणक: 18°52′N 76°29′E / 18.86°N 76.48°E |
?इंदपवाडी Indapwadi महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
५.३५ चौ. किमी • ५०७.७२१ मी |
अंतर • परळी वैजनाथ पासून • सोमेश्वर मंदिर जिरेवाडी पासून • रतनेश्वर मंदिर टोकवाडी पासून |
• ४ किमी • २ किमी • २ किमी |
मुख्यालय | ग्रामपंचायत कार्यालय इंदपवाडी |
जवळचे शहर | परळी वैजनाथ |
विभाग | मराठवाडा |
जिल्हा | बीड |
तालुका/के | परळी वैजनाथ |
लोकसंख्या • घनता |
१,५४८ (2011) • २८९/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | सौ शालूबाई फुलचंद मुंडे |
माजी सरपंच | रमेश एकनाथ मुंडे |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 431515 • MH-44 |
इंदपवाडी हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परभणी जिल्ह्याच्या सरहद्दीवरचे एक गाव आहे. हे परळी वैजनाथ या तालुक्याच्या गावापासून ३ किमी अंतरावर डोंगरात वसलेले आहे.
या गावात एक मंदिर आहे; त्यालगतच शाळा आहे,
शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी असे आहे. शाळेच्या समोर विठ्ठल रुक्मिणी चे व हनुमान मंदिर आहे मंदिरासमोर वडाची दोन मोठी झाडे आहेत तसेच इंदपवाडी हे ऐक प्रगतशिल गाव आहे गावातील शाळा ही 5 वी पर्यंत आहे शाळा अतिशय सुंदर व स्वच्छ आहे आणि पूर्ण पणे सीसीटीव्ही(CCTV) च्या नजरेत आहे म्हणजे सांगायचे झाले तर शाळा ही पूर्णपणे आत्याधूनिक(DIGITAL) आहे. गावाच्या उत्तरेला कानिफनाथ टेकडी आहे तेथे कानिफनाथ नावाचे देवस्थान आहे हे देवस्थान अतिशय रम्य अश्या ठिकाणी आहे या जागेला कानिफनाथ गड असे देखील म्हणले जाते. या ठिकाणी जाण्यासाठी इंदपवाडी ला खेटून असलेल्या सूतगिरणी च्या मधून रोड आहे तसेच या गावाला आणखी एक मंदिर आहे ते म्हणजे आईचे हे जिरेवाडी च्या सोमेश्वर मंदिर च्या पश्चिमेला डोंगरावर आहे या देवीला देवतळी ची आई म्हण ओळखले जाते इंदपवाडीच्या पश्चिमेला बीड जिल्हयातला अंबेजोगाई तालुका आहे, उत्तरेला सोनपेठ तालुका (परभणी जिल्हा), पूर्वेला गंगाखेड तालुका, तर दक्षिणेला रेणापूर तालुका आहे. बीड शहर इंदपवाडीच्या पश्चिमेला ९७ किमी.वर आहे.
इंदपवाडीची इतर गावांपासूनची अंतरे
[संपादन]- जिरेवाडी १.५ किमी
- टोकवाडी २.५ किमी
- डाबी २ किमी
- वैजनाथ मंदिर ३ किमी
- सोमेश्वर मंदिर १.५ किमी
- रत्नेश्वर मंदिर १ किमी
- गोपीनाथ गड १० किमी
- नांदेड रेल्वे स्थानक ९९ किमी
- परळी वैजनाथ रेल्वे स्थानक ३ किमी
- बीड ९७ किमी
- मुंबई ४५३ किमी
पर्यावरण समस्या व महत्त्वाची वैशिष्ठ्ये
[संपादन]गावाला लागुनच परळी वैजनाथ औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची दोन राखेची तळी आहेत त्यामुळे येथील वातावरण प्रदूषित झाले आहे. लोकांना आरोग्याच्या गंभीर समस्या भेडसावत आहेत.[१] बेसुमार भूजल उपसा व कमी पाऊस यामुळे गावातील पाण्याची समस्या अत्यंत बिकट झाली आहे.[२]
गावातील देवाची मंदिरे
[संपादन]इंदपवाडी गावात मध्य भागी जिल्हा परिषद शाळे शेजारी विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिर आहे व शाळेच्या दक्षिणेकडे डोंगर असून डोंगरावर गावदेवतेचे मंदिर आहे त्या मंदिरातील देवीला देवतळी ची आई म्हणून ओळखले जाते आणि तसेच गावाच्या उत्तरेस एक टेकडी आहे त्या टेकडीवर कान्होबा हे देवस्थान आहे म्हणून त्या टेकडीस कान्होबा टेकडी असे म्हणले जाते.
संदर्भ
[संपादन]- ^ "औष्णिक केंद्र बंद असतानाही राखेची डोकेदुखी कायम". सकाळ. ३ डिसेंबर २०१५.[permanent dead link]
- ^ "हंडाभर पाण्यासाठी परळी तालुक्यात रांगा". सकाळ. १ फेब्रुवारी २०१६.[permanent dead link]