आंगवली
| ?आंगवली महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | संगमेश्वर |
| जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
आंगवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]आंगवली गाव हा डोंगराच्या कुशीत वसलेला एक निसर्गरम्य गाव आहे. पावसाळ्यात नदी नाले ओसंडून वाहतात व सुंदर सुंदर धबधबे दिसू लागतात.पावसाळ्यातून आंगवली गावकर वाडीतून थोड्याच अंतरावर असलेल्या लिंगाचा डोंगर हे क्षेत्र प्रसिद्ध ट्रेकिंग पॉइंट आहे. इथे आल्यावर स्वर्गात आल्याचा अनुभव येतो. आकर्षक धबधबे डोंगरावर पसरलेली गवताची हिरवीगार शाल पर्यटकांचं मन मोहून टाकते.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]श्री देव मार्लेश्वर देवालय (आद्यादेवस्थान)
श्री सोमेश्वर मंदिर
लिंगाचा डोंगर ( ट्रेकिंग साठी फक्त पावसाळ्यातून )
बावनदी ( श्री क्षेत्र मार्लेश्वर येथून येणारी पवित्र गंगा )
नागरी सुविधा
[संपादन]आंगवली गावात येण्यासाठी देवरुख बस स्टँड वरून अनेक बसेस आहेत . कोकणात प्रसिद्ध असलेलं श्री मार्लेश्वर आद्य देवस्थान याच गावात असल्याने अनेक वाहनाच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
उत्कृष्ट दर्जाचे रस्ते आधुनिक शाळा व महाविद्यालय
जवळपासची गावे
[संपादन]आंगवली गाव हा विस्ताराने खूप मोठा आहे. गावाला लागून मारळ, बोंड्ये, कासारकोळवण, निवे खुर्द, निगुडवाडी, सोनारवाडी अशा गावांच्या सीमा लागतात.
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/