अशोकवदन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अशोकवदन (अशोकांच्या गोष्टी) हे २ ऱ्या शतकात लिहिले गेलेले मौर्य सम्राट अशोक यांच्या संदर्भातील आख्यायिकांवर आधारलेले पुस्तक आहे. चिनी लेखक फाहियान यांनी इ.स. ३०० साली या आख्यायिकांचा चिनी भाषेत अनुवाद केला. अशा वेगवेगळ्या गोष्टींचे संकलन करून निर्मिलेल्या दिव्यवदन (दैवी गौष्टी) या मोठ्या पुस्तकाचा अशोकवदन हा एक भाग आहे. राजा अशोकांचा जन्म आणि त्यांचे राज्यशासन, याविषयीचे तपशीलवार वर्णन अशोकवदनात, बुद्धांच्या या भाकितासंदर्भात त्यांच्याच शब्दात असे म्हटलेले आहे की, “माझ्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी पाटलीपुत्र नगरात अशोक नावाचा एक सम्राट उदयास येईल. पृथ्वीवरच्या चार खंडांपैकी एकावर तो राज्य करेल; आणि माझे अवशेष जतन करत जंबुद्वीपाची शोभा वाढवेल. लोकांच्या कल्याणासाठी तो ८४,००० स्तूप बांधेल, ज्याबद्दल महान विभूतींना आणि माणसांना आदर वाटेल आणि त्यामुळे अशोकांच्या कीर्तीत भर पडून ती दूरवर पसरेल. त्यांना मिळालेली सर्वात स्तुत्य अशी भेट म्हणजे, जयाने तथागताच्या कटोऱ्यात फेकलेली ओंजळभर मूळ-माती, ही होती.”

या भविष्यवाणीच्या अनुषंगाने अशोकवदन मध्ये पुढे असे म्हटले आहे की, मौर्य सम्राट बिंदुसारांचा मुलगा म्हणून अशोक जन्मला आले. त्यांची आई ही गरीब ब्राह्मणाची मुलगी होती. त्या जरी पुरोहिताच्या वंशातील असल्यातरी त्या जन्माने राजघराण्यातील नसल्यामुळे राजाच्या तुलनेत त्या कमी दर्जाची समजल्या जायच्या. त्यांच्या पोटी जन्माला येणारा मुलगा हा एक महान राजा बनेल, असे त्यांच्याबद्दल केलेले भविष्य लक्षात घेऊन, त्यांच्या वडिलांनी त्यांना सम्राटाच्या राणीवशात अक्षरशः घुसवले होते.

अशोकवदन या पुस्तकाचा उल्लेख उल्लेख आणखी एका संदर्भात केला जातो तो म्हणजे इ.स.पू. १८० मध्ये शुंगराजा पुस्यमित्र शुंग या यांच्या संदर्भातील तपशील होता. हा राजा बौद्ध धर्मावरील श्रद्धेचा शत्रू समजला जायचा आणि तो राजा होण्यापूर्वी कितीतरी पूर्वीपासून मौर्य साम्राज्याने बौद्ध धर्माला पाठिंबा दिला होता. जॉन स्ट्रॉंग यांनी अनुवादित केलेल्या अशोकवदन मधील १३३ व्या गोष्टीत याबाबतचा असा उल्लेख सापडतो की, “राजा पुस्यमित्राने चौपट सेना सज्ज करून बौद्ध धर्माला नामशेष करण्याच्या हेतूने तो कुक्तुटराम इथे गेला. त्याने संघरामचा विध्वंस केला तिथल्या भिक्खूंना ठार मारले व तेथून निघून गेला. काही काळानंतर तो साकला येथे आला आणि जो कोणी जो कोणी बौद्ध भिक्खूंच्या प्रमुखाला त्याच्या समोर आणून उभा करेल, त्याला ह्या राजा शंभर दिनार बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले.”

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]