अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु (पुस्तक)
अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु[१] या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्राह्मणी पितृसत्तेवरील लिखाणाचे संकलन केलेले आहे. हे संकलन भारतातील स्त्रीवादी समाजशास्त्रज्ञ शर्मिला रेगे यांनी केले व २०१३ मध्ये नवयान प्रकाशन द्वारा प्रकाशित झाले.
रूपरेषा
[संपादन]या पुस्तकाला तीन भागांमध्ये विभागले गेलेले आहे: जात व जाती अंतर्गत विवाह (caste and endogamy), मनुचे वेडेपण (The Madness of Manu ) व हिंदू कोड बिलची न स्वच्छ केलेली व न बोलली जाणारी मृत्यू (The unswept and Unsung Death of द हिंदू Code Bill). या तीन विभागांना एकत्र पाहिल्यास ब्राह्मणी पितृसत्तेची गुणवैशिष्ठ्य तसेच जातीची रचना घडवण्यासाठी लिंगभावात्मक हिंसेचे साधन यांचा उलगडा होतो.
प्रतिक्रिया /योगदान
[संपादन]स्त्री अभ्यास व समाजशास्त्रच्या विद्यार्थ्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे मानले गेले व भारतातील स्त्रीवादी समुदायांनी या पुस्तकाला चांगली प्रतिक्रिया दिली.[२][३]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ Ambedkar, Bhimrao Ramji (2013). Against the Madness of Manu: B.R. Ambedkar's Writings on Brahmanical Patriarchy (इंग्रजी भाषेत). Navayana Pub. ISBN 9788189059538.
- ↑ "Navayana | Against the Madness of Manu". navayana.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-23 रोजी पाहिले.
- ↑ "Manu, FIaw-Giver". https://www.outlookindia.com/. 2018-03-23 रोजी पाहिले. External link in
|work=(सहाय्य)