Anshuman Vichare (es); अंशुमन विचारे (mr); Anshuman Vichare (en); Anshuman Vichare (ast); Anshuman Vichare (sq); Anshuman Vichare (nl) attore indiano (it); ভারতীয় অভিনেতা (bn); acteur indien (fr); India näitleja (et); aktore indiarra (eu); actor indiu (ast); actor indi (ca); Indian actor (en); ator indiano (pt); aktor indian (sq); بازیگر هندی (fa); 印度演員 (zh); indisk skuespiller (da); actor indian (ro); indisk skådespelare (sv); indisk skodespelar (nn); שחקן הודי (he); acteur (nl); actor indio (gl); индийский актёр (ru); actor indio (es); intialainen näyttelijä (fi); Indian actor (en); ممثل هندي (ar); indiai színész (hu); індійський актор (uk)
अंशुमन विचारे (जन्म:१३ नोव्हेंबर, १९७५) हे एक मुंबईस्थित अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि दूरचित्रवाणी कलाकार आहेत. ऑस्कर-नामांकित मराठी चित्रपट 'श्वास' मधील एका भूमिकेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. विचारे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे. तसेच ते विविध दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील करत असतात.[१]
विचारे चा जन्म १३ नोव्हेंबर १९७५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या गावी झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी प्रथम वाणिज्य शाखेची पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी विपणन व्यवस्थापन विषयात पदविका प्राप्त केली.
अंशुमन विचारे च्या पत्नीचे नाव पल्लवी असून त्या कायद्यातील पदवीधर आहेत. लग्नापूर्वी पल्लवी यांनी काटा रुते कुणाला, कुकुचकू, आई अशा विविध मराठी मालिकात काम केलेले आहे. एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान दोघांची चांगली मैत्री जुळली आणि २०१४ मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. त्यांना अन्वी नावाची एक मुलगी देखील आहे.[२]