अँडी रॉडिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अँड्र्यू स्टीवन रॉडिक
ॲंडी रॉडिक
देश Flag of the United States अमेरिका
वास्तव्य ऑस्टिन, टेक्सास
जन्म ३० ऑगस्ट, १९८२ (1982-08-30) (वय: ४१)
ओमाहा, नेब्रास्का
सुरुवात २०००
निवृत्ती २०१२
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $ २०,६३७,३९०
एकेरी
प्रदर्शन ६१२ - २१३
अजिंक्यपदे ३२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१ नोव्हेंबर २००३)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (२००३, २००५, २००३, २००९)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२००९)
विंबल्डन उपविजेता (२००४, २००५, २००९)
यू.एस. ओपन विजयी (२००३)
दुहेरी
प्रदर्शन ६७ - ५०
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जुलै २०१३.


अँड्र्यू स्टीवन रॉडिक (इंग्लिश: Andrew Stephen "Andy" Roddick; ३० ऑगस्ट १९८२) हा एक निवृत्त अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. ए.टी.पी. जागतिक क्रमवारीमध्ये काही काळ अव्वल क्रमांकावर असलेल्या रॉडिकने २००३ यू.एस. ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले होते. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या एकेरीमध्ये विजय मिळवणारा तो अखेरचा अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. ह्या व्यतिरिक्त रॉडिकने इतर चार ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठल्या परंतु ह्या चारही अंतिम सामन्यांमध्ये त्याला रॉजर फेडररकडून हार पत्करावी लागली.

२०१२ यू.एस. ओपन स्पर्धेदरम्यान रॉडिकने निवृत्ती जाहीर केली. ब्रूकलिन डेकर ही अमेरिकन मॉडेल त्याची पत्नी आहे.

बाह्य दुवे[संपादन]