Jump to content

सरकारी साहित्य पुरस्कार २०१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र सरकार मराठीतील प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींना पुरस्कार देत असते. इ.स. २०११-१२ या वर्षातील साहित्य पुरस्कार २०१३साली जाहीर होतात. असे मार्च २०१३मध्ये जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे -


आत्मचरित्र

लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : डॉ. श.रा. राणे (प्रिय वत्सला) व ल.सि. जाधव (होरपळ)

इतिहास

शाहू महाराज पुरस्कार (एक लाख रुपये) : डॉ. मधुकर केशव ढवळीकर (महाराष्ट्राची कुळकथा)

कथासंग्रह

दिवाकर कृष्ण पुरस्कार (एक लाख रुपये) : मोनिका गजेंद्रगडकर (शिल्प)

कथासंग्रह (प्रथम प्रकाशन)

ग.ल. ठोकळ पुरस्कार (५० हजार रुपये) किरण अनंत गुरव (राखीव सावल्यांचा खेळ)

कादंबरी

हरी नारायण आपटे पुरस्कार (एक लाख रुपये) : अशोक पवार (पडझड)

कादंबरी (प्रथम प्रकाशन)

श्री.ना. पेंडसे पुरस्कार (५० हजार रुपये) : माधुरी तळवळकर (कॉल सेंटर डॉट कॉम)

काव्यः

कवी केशवसुत पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : रवींद्र इंगळे चावरेकर (ग्लोबलोपनिषद) व श्रीधर कृष्ण शनवारे (सरवा)

काव्य (प्रथम प्रकाशन)

बहिणाबाई चौधरी पुरस्कार (५० हजार रुपये) विभागून :रफीक सूरज (सोंग घेऊन हा पोर) व शरयू आसोलकर (तुटलेपण पुन्हा बांधून घेताना)

चरित्र

न.चिं. केळकर पुरस्कार (एक लाख रुपये) : प्रभा नवांगुळ (राजबंदिनी आँग सान स्यूची हिचे चरित्र)

दलित साहित्यः

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार (एक लाख रुपये) : रामचंद्र नलावडे (वडारगाडा)

नाटक/एकांकिका

राम गणेश गडकरी पुरस्कार (एक लाख रुपये) : आनंद विनायक जातेगावकर (कैफियत)

नाटक/एकांकिका (प्रथम प्रकाशन)

विजय तेंडुलकर पुरस्कार (५० हजार रुपये) : रविशंकर झिंगरे (पुस्तकाच्या पानातून)

भाषाशास्त्र (व्याकरण)

नरहर कुरुंदकर पुरस्कार (एक लाख रुपये) : डॉ. नंदकुमार मोरे (समाज भाषा विज्ञान आणि मराठी कादंबरी)

राज्यशास्त्र/ समाजशास्त्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : प्रकाश पवार (समकालीन राजकीय चळवळी - नवहिंदुत्व व जात संघटना) व मुक्ता मनोहर (नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध)

ललितगद्यः

अनंत काणेकर पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : विष्णू जयवंत बोरकर (प्रास) व सुरेश द्वादशीवार (तारांगण)

ललितगद्य (प्रथम प्रकाशन)

ताराबाई शिंदे पुरस्कार (५० हजार रुपये) : मनोहर सोनवणे (सदरा बदललेली माणसं)

विनोद

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार (एक लाख रुपये) : मुकुंद टाकसाळे (राधेने ओढला पाय)

समीक्षा/वाङ्‌मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन

श्री. के. क्षीरसागर पुरस्कार (एक लाख रुपये) : गंगाधर पाटील (समीक्षामीमांसा - सिद्धान्त आणि समीक्षण)

समीक्षा/सौंदर्यशास्त्र (प्रथम प्रकाशन)

रा. भा. पाटणकर पुरस्कार (५० हजार रुपये) सदानंद राणे (लोकगंगा - महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकनृत्ये)


अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन

सी. डी. देशमुख पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : जयराज साळगावकर (पैसा आणि मध्यमवर्ग) व डॉ. भालचंद्र मुणगेकर (आर्थिक सुधारणा आणि विकासाचा मानवी चेहरा)

तत्त्वज्ञान व मानसशास्त्र

ना. गो. नांदापूरकर पुरस्कार (एक लाख रुपये) : अच्युत गोडबोले (मनात)

पर्यावरण

डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार (एक लाख रुपये) : प्रफुल्ल कदम (सुरुवात एका सुरुवातीची)

विज्ञान व तंत्रज्ञान

महात्मा जोतिराव फुले पुरस्कार (एक लाख रुपये) : अच्युत गोडबोले, डॉ. माधवी ठाकूरदेसाई (नॅनोदय)

शिक्षणशास्त्र

कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार (एक लाख रुपये) ; प्रवीण दवणे (अध्यापन आणि नवनिर्मिती)

शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन

वसंतराव नाईक पुरस्कार (एक लाख रुपये) : डॉ. यू.डी. चव्हाण, डॉ. जगन्नाथ विष्णू पाटील (कडधान्य लागवड ते प्रक्रिया उद्योग)


अनुवादित

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार (एक लाख रुपये) : मिलिंद चंपानेरकर (लोकशाहीवादी अम्मीस - दीर्घपत्र)

संकीर्ण (क्रीडासह)

भाई माधवराव बागल पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : संध्या नरे-पवार (डाकीण एक अमानवी प्रथा : शोध आणि अन्वयार्थ) व मिलिंद गुणाजी (अनवट)

संपादित/आधारित

रा. ना. चव्हाण पुरस्कार (एक लाख रुपये) : मृणालिनी चितळे (कर्त्या-करवित्या)


बालवाङ्‌मय

[संपादन]
कथा (छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथांसह)

राजा मंगळवेढेकर पुरस्कार (५० हजार रुपये) विभागून : दिलीप प्रभावळकर (बोक्‍या सातबंडे - भाग ६) व कविता महाजन (जोआनाचे रंग)

कविता

बालकवी पुरस्कार (५० हजार रुपये): राजेश बारसागडे (कोंबडा झाला घड्याळ)

कादंबरी

साने गुरुजी पुरस्कार (५० हजार रुपये) विभागून : विठ्ठल जाधव (पांढरा कावळा) व मोहन जोशी (परश्‍या)

नाटक/एकांकिका

भा.रा. भागवत पुरस्कार (५० हजार रुपये) : ऊर्मिला राघवेंद्र चाकूरकर (अग्निशिखा कावेरी)

सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)

यदुनाथ थत्ते पुरस्कार (५० हजार रुपये) : डॉ. बाळ फोंडके (काय?)

संकीर्ण

ना. धों. ताम्हणकर पुरस्कार (५० हजार रुपये) : राम प्रधान (आर्य चाणक्‍य)

महाराष्ट्राबाहेरील मराठी साहित्य

[संपादन]
सर्व वाङ्‌मय प्रकार

सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार (एक लाख रुपये) : गोव्याचे प्रा. गोपाळराव मयेकर (मज दान कसे हे पडले)


पहा : पुरस्कार