Jump to content

वैजनाथ पुंडलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वैजनाथ पुंडलिक
जन्म २३ डिसेंबर, इ. स. १९१३
परळी वैजनाथ, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ९ मार्च, इ. स. २००९
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा वास्तुरचनाकार, वास्तुतज्ज्ञ
कारकिर्दीचा काळ इ. स. १९३८ - इ. स. १९७३
ख्याती भारतीय संसदेची वास्तुरचना
धर्म हिंदू
जोडीदार कुसुम पुंडलिक


वैजनाथ मोहिनीराज पुंडलिक (२३ डिसेंबर, इ. स. १९१३ - ९ मार्च, इ. स. २००९) हे भारताचे एक मोठे वास्तुरचनाकार आणि वास्तुतज्ज्ञ होऊन गेले. इ. स. १९५२ साली भारतीय संसदेच्या नवीन इमारतीचीची वास्तुरचना बनवण्याचे काम त्यांनी केले होते. तीच इमारत आजही वापरली जाते.[]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

वैजनाथ पुंडलिक यांचा जन्म २३ डिसेंबर, इ. स. १९१३ रोजी परळी वैजनाथ येथे झाला. गावाचे नाव परळी वैजनाथ म्हणून त्यांचे नाव वैजनाथ असे ठेवण्यात आले. त्यांना 'गोपाळ' या नावाने सर्वजण हाक मारीत. त्याचे वडील पोस्टमास्टर आणि तारमास्टर होते. त्या काळी परभणी हे निजामच्याच्या राज्यात असल्याने उर्दू शिकणे त्यांना बंधनकारक होते. वडिलांची परत बदली झाल्यामुळे पंढरपूर येथे त्यांचे नववीपर्यंत शिक्षण झाले. इ. स. १९३१ मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या परीक्षेच्या वेळी तब्येत बरी नसल्याने चक्कर आली आणि पेपर देता आले नाहीत. त्यामुळे मॅट्रिकला नापास झाले. आपली तब्येत चांगली असायला हवी नाहीतर कायम असेच आजारी पडून आयुष्याचे नुकसान होईल हे त्यांनी जाणले आणि भरपूर व्यायाम करायला सुरुवात केली.

कारकीर्द

[संपादन]

बडोद्यातील कलाभवन महाविद्यालयात इ.स. १९३४ "इंटरमिजियट आर्किटेक्चर" पूर्ण केले. त्याचवेळी मुंबई येथील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये बाहेरून "Advance Diploma" पूर्ण केला. वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने लगेचच नोकरी करणे आवश्यक झाले. सुवर्ण पाठकी अँड सन्स येथे ड्राफ्ट्समनची नोकरी सुरू केली. त्यानंतर दिल्ली इम्पृमेंट्स या शहर आराखडा तयार करणारी संस्थेत रुजू झाले. इ. स. १९३८ मध्ये "Central Public Work Department" येथे सीनियर ड्राफ्ट्समनच्या पदावर कामाला सुरुवात केली. त्यानंतर बढती मिळत मिळत इ. स. १९५२ मध्ये "सीनियरआर्किटेक्ट" बनले. त्या काळात दिल्ली शहरातील अनेक महत्त्वाचे विकास आराखडे त्यांनी बनवले आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना मोतीलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्याचे आदेश दिले होते. पण तो चुकीच्या ठिकाणी उभे करण्याचे आदेश असल्याने वैजनाथ पुंडलिक यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना विरोध केला. त्याचे त्यांनी योग्य असे स्पष्टीकरण पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिले. शेवटी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तो आदेश बदलला आणि वैजनाथ पुंडलिक यांना पूर्ण मोकळीक देऊन योग्य ठिकाणी तो पुतळा उभा करून घेतला.

वास्तुरचना केलेली केलेली महत्त्वाची बांधकामे

[संपादन]
  1. भारतीय संसद: इ. स. १९५२ पूर्वी भारतीय संसदेची बैठकव्यवस्था १४८ जणांसाठी होती. संसदेचे पहिले अध्यक्ष मावळणकर यांनी भविष्याचा विचार करून ५०० जण बसू शकतील असे सभागृह असलेल्या संसदेच्या इमारतीचा आराखडा बनवण्यास वैजनाथ पुंडलिक यांना सांगितले. त्यांनी अतिशय कमी काळात उत्तम आराखडा बनवून सर्वांची वाहवा मिळवली.
  2. अशोक स्तंभ : दिल्ली येथील राष्ट्रपती भवनासमोर असलेला अशोक स्तंभ
  3. केंद्रीय अबकारी खात्याची इमारत
  4. आयकर विभागाच्या कार्यालय
  5. पंजाब, काश्मीर, मद्रास, मध्य प्रदेश, बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश येथील आयकर विभागाची कार्यालये

धार्मिक उपासना

[संपादन]

एका धार्मिक सतपुरुषाच्या सान्निध्यात आल्यामुळे ते धार्मिक उपासने कडे वळले. त्यानंतर मालेगावचे आबा मालेगावकर यांच्याकडून मंत्र, तंत्र आणि उपासना तसेच अध्यात्म याचे मार्गदर्शन घेतले. पुढील काळात त्यांनी अनेक व्यक्तींना मंत्र आणि उपासना या करिता मार्गदर्शन केले.

वैयक्तिक

[संपादन]

वैजनाथ पुंडलिक यांचे कुसुम पुणतांबेकर यांच्याशी १५ मार्च, इ. स. १९४० रोजी लग्न झाले. त्यांना पाच मुली आणि दोन मुले आहेत.

पर्वती चढणे

[संपादन]

इ. स. १९७३ पासून न चुकता हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा याची पर्वा न करता वैजनाथ पुंडलिक अगदी वृद्ध होईपर्यंत पुणे शहरातील पर्वतीचा डोंगर चढण्याचा व्यायाम करीत असत.

सत्कार आणि पुरस्कार

[संपादन]

इ. स. २००३ मध्ये ऋषितुल्य व्यक्तिमत्त्त्व म्हणून त्यांचा पुणे येथे सत्कार करण्यात आला.[]

निधन

[संपादन]

९ मार्च, इ. स. २००९ रोजी पुणे येथे निधन झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ दैनिक प्रभात "उपासना व्यायामामुळे जीवन सुखद" Check |दुवा= value (सहाय्य). १८ जानेवारी २००४ रोजी पाहिले.
  2. ^ "ऋषितुल्य तपस्वींच्या कार्यातून". २ सप्टें २००३ रोजी पाहिले.[मृत दुवा]