Jump to content

अशोक परांजपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अशोक गणेश परांजपे (जन्मदिनांक अज्ञात - एप्रिल ९, इ.स. २००९) हे मराठी गीतकार होते. ते मुंबई येथे महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते. त्यानंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले होते.

अशोक परांजपे यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गण-गवळण आणि नाट्यगीत या प्रकारची गीते लिहिली. इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये जाउन तेथील लोककलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या. त्या संदर्भात परांजपेंनी १९९२मध्ये पंढरपूर भक्तिसंगीत महोत्सव आणि १९८६मध्ये आनंदवन येथील महाराष्ट्र आदिवासी कला महोत्सव, असे दोन महोत्सव आयोजित केले. या कामाची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली आणि ऑस्ट्रियातल्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हिडिओग्राफी (आयओव्ही) या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने परांजपे यांना सभासदत्व दिले. त्यानंतर अशोक परांजपे यांनी अनेक मराठी कलावंतांना फ्रान्स, आयर्लंड, जपान आदी देशांत नेऊन तेथे त्यांना कला सादर करण्याची संधी मिळवून दिली.

जीवन

[संपादन]

मूळ सांगली जिल्ह्यातील हरीपूरचे असलेले अशोकजी परांजपे यांनी केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, अवघे गरजे पंढरपूर, कैवल्याच्या चांदण्याला, नाविका रे वारा वाहे रे, ही आणि इतर अनेक प्रसिद्ध मराठी गाणी लिहिली.

परांजप्यांनी एप्रिल ९, इ.स. २००९ रोजी त्यांच्या औरंगाबादेतील निवासस्थानी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

साहित्य

[संपादन]

नाटके -

  • संत कान्होपात्रा
  • संत गोरा कुंभार
  • सगीत संत गोरा कुंभार
  • बुद्ध इथे हरला आहे

काही गीते

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

नाविका रे वारा वाहे रे
डौलानं हाक जरा आज नाव रे
या गाण्यात तर अशोकजींचे शब्द, अशोक पत्कींची सुरेल सुरावट आणि सुमन कल्याणपूर यांचा गोड आवाज, यांचा असा काही मिलाप झाला की हे गाणे खूपच लोकप्रिय झाले. या गाण्याला १९७५ सालचा ‘बेस्ट सॉंग’चा पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "अशोक परांजप्यांनी लिहिलेली गीते".