केव्हिन रुड
केव्हिन रुड | |
ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २७ जून २०१३ – सप्टेंबर २०१३ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | ज्युलिया जिलार्ड |
पुढील | टोनी ॲबट |
कार्यकाळ ३ डिसेंबर २००७ – २४ जून २०१० | |
मागील | जॉन हॉवर्ड |
पुढील | ज्युलिया जिलार्ड |
मजूर पक्षाचा पक्षनेता
| |
विद्यमान | |
पदग्रहण २७ जून २०१३ | |
पंतप्रधान | केव्हिन रुड |
संसद सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण ३ ऑक्टोबर १९९८ | |
जन्म | २१ सप्टेंबर, १९५७ नांबूर, क्वीन्सलंड |
राजकीय पक्ष | मजूर पक्ष |
सही |
केव्हिन मायकेल रुड ( सप्टेंबर २१, १९५७) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा विद्यमान पंतप्रधान व मजूर पक्षाचा विद्यमान पक्षनेता आहे. ह्यापूर्वी रुड २००७ ते २०१० दरम्यान पंतप्रधानपदावर होता. ज्युलिया जिलार्डने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ३ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर २६ जून २०१३ रोजी घेण्यात आलेल्या मजूर पक्षाच्या आंतरिक निवडणुकीमध्ये केव्हिन रुडने जिलार्डचा ५७ विरुद्ध ४५ अशा मतफरकाने पराभव केला व मजूर पक्षाचे नेतृत्व पटकावले. ही निवडणुक हरल्यास राजकारणामधून निवृत्त होऊ अशी घोषणा करणाऱ्या जिलार्डने पराजयानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व केव्हिन रूडने ह्या पदाची सुत्रे स्वीकारली. परंतु सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रूडच्या मजूर पक्षाला बहुमत मिळवण्यात आले व लिबरल पार्टीला सर्वाधिक मते मिळाली.
समलिंगी विवाहाला पाठिंबा देणारा रुड हा पहिलाच ऑस्ट्रेलियन पंतप्रधान होता.