Jump to content

टोनी ॲबट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टोनी ॲबट

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान
कार्यकाळ
१८ सप्टेंबर २०१३  १५ सप्टेंबर २०१५
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील केव्हिन रुड
पुढील माल्कम टर्नबुल

लिबरल पक्षाचा अध्यक्ष
कार्यकाळ
१ डिसेंबर २००९  १४ सप्टेंबर २०१५

ऑस्ट्रेलियाचा संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२६ मार्च १९९४

जन्म ४ नोव्हेंबर, १९५७ (1957-11-04) (वय: ६८)
लंडन, युनायटेड किंग्डम
राजकीय पक्ष लिबरल पक्ष
पत्नी मार्गारेट ॲबट
गुरुकुल ऑक्सफर्ड विद्यापीठ
धर्म रोमन कॅथलिक

ॲंथनी जॉन ॲबट ( नोव्हेंबर ४, १९५७) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा माजी पंतप्रधान व लिबरल पक्षाचा माजी पक्षनेता आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पक्षाला बहुमत मिळाले व पक्षनेता ह्या नात्याने ॲबट नवा पंतप्रधान बनला. २ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर ॲबट सरकारच्या कामगिरीबद्दल लिबरल पक्षामध्ये असंतोष पसरला होता. १४ सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आलेल्या पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये ॲबटला माल्कम टर्नबुल ह्या नेत्याने ५४-४४ असे पराभूत केले. पक्षनेतेपद गेल्यामुळे ॲबटला पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे भाग पडले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत