Jump to content

माल्कम टर्नबुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माल्कम टर्नबुल

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान
कार्यकाळ
१५ सप्टेंबर २०१५  २४ ऑगस्ट २०१८
राणी एलिझाबेथ दुसरी
उपपंतप्रधान वॉरन ट्रस
मागील टोनी ॲबट
पुढील स्कॉट मॉरिसन

लिबरल पक्षाचा अध्यक्ष
कार्यकाळ
१४ सप्टेंबर २०१५  २४ ऑगस्ट २०१८

ऑस्ट्रेलियाचा संसद सदस्य
कार्यकाळ
९ ऑक्टोबर २००४  ३१ ऑगस्ट २०१८

जन्म २४ ऑक्टोबर, १९५४ (1954-10-24) (वय: ७१)
सिडनी, ऑस्ट्रेलिया
राजकीय पक्ष ऑस्ट्रेलियाची लिबरल पार्टी
पत्नी ल्युसी टर्नबुल
गुरुकुल सिडनी विद्यापीठ
धर्म रोमन कॅथलिक

माल्कम ब्लाय टर्नबुल (Malcolm Turnbull; २४ ऑक्टोबर १९५४) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा माजी पंतप्रधान व लिबरल पक्षाचा माजी पक्षनेता आहे. सप्टेंबर २०१३ पासून पंतप्रधानपदावर राहिलेल्या टोनी ॲबट सरकारच्या कामगिरीबद्दल लिबरल पक्षामध्ये असंतोष पसरला होता. १४ सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आलेल्या पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये ॲबटला टर्नबुलने ५४-४४ असे पराभूत केले. पक्षनेतेपद मिळवल्यानंतर टर्नबुलची ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. ऑगस्ट २०१८ मध्ये टर्नबुलने पक्षाचे अध्यक्षपद व पंतप्रधानपद ह्या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन राजकारणामधून निवृत्ती पत्कारली.

बाह्य दुवे

[संपादन]