Jump to content

माधव श्रीहरी अणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Madhav Shrihari Aney (es); মাধব শ্রীহরি আনে (bn); Madhav Shrihari Aney (hu); માધવ શ્રીહરિ આને (gu); Madhav Shrihari Aney (ast); Madhav Shrihari Aney (ca); Madhav Shrihari Aney (yo); Madhav Shrihari Aney (de); Bāpūjī Aṇe, (vi); Madhav Shrihari Aney (ga); Madhav Shrihari Aney (nb); Madhav Shrihari Aney (da); Madhav Shrihari Aney (sl); Madhav Shrihari Aney (fr); Madhav Shrihari Aney (nl); Madhav Shrihari Aney (id); Madhav Shrihari Aney (sv); Madhav Shrihari Aney (nn); മാധവ് ശ്രീഹരി അനെ (ml); ಮಾಧವ್ ಶ್ರೀಹರಿ ಆನಿ (tcy); ಮಾಧವ್ ಶ್ರೀಹರಿ ಆನಿ (kn); माधव श्रिहरी आने (hi); మాధవ్ శ్రీహరి అనే (te); ਮਾਧਵ ਸ਼੍ਰੀਹਰੀ ਅਣੇ (pa); Madhav Shrihari Aney (en); مادهاف شريهاري أني (ar); ମାଧବ ଶ୍ରୀହରି ଅଣେ (or); माधव श्रीहरी अणे (mr) político indio (es); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); homme politique indien (fr); સંસ્કૃત સાહિત્યકાર અને ભારતીય રાજનેતા (gu); India poliitik (et); سياسي هندي (ar); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); políticu indiu (1880–1968) (ast); polític indi (ca); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ഇന്ത്യന്‍ രചയിതാവ്‌ (ml); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ ଓ ଲେଖକ (or); Indian politician (en-gb); سیاست‌مدار هندی (fa); político indio (gl); indisk politiker (da); politician indian (ro); polaiteoir agus scríbhneoir Indiach (ga); ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು (kn); Indiaas politicus (1880-1968) (nl); indisk politiker (sv); indisk politikar (nn); indisk politiker (nb); ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರೋಡು ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಇನಾಮು ತಿಕಿನಾರ್ (tcy); भारतीयराजनेतारः (sa); संस्कृत भाषा के प्रतिष्ठित साहित्यकार , भारतीय राजनीतिज्ञ (hi); భారతీయ రాజకీయవేత్త (te); פוליטיקאי הודי (he); Indian politician and writer (1880–1968) (en); Indian politician (en-ca); politikan indian (sq); भारतीय राजकारणी (mr) लोकनायक बापुजी अणे, लोकनायक बापूजी अणे (mr); ఎం. ఎస్. అనే (te); M. S. Aney (en); এম. এস. আনে (bn); एम. एस. अणे (hi)
माधव श्रीहरी अणे 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट २९, इ.स. १८८०
वणी
मृत्यू तारीखजानेवारी २६, इ.स. १९६८
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
उल्लेखनीय कार्य
  • Sritilakayasornavah
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

लोकनायक बापूजी अणे उपाख्य डॉ. माधव श्रीहरी अणे (२९ ऑगस्ट १८८० - २६ जानेवारी १९६८) हे एक शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि आधुनिक संस्कृत कवी होते. त्यांना "लोकनायक बापूजी" म्हणजे "लोकनेते आणि आदरणीय पिता" ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती. ते काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते. ते जानेवारी १२,इ.स. १९४८ ते जून १४,इ.स. १९५२ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.

टिळकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे न.चिं. केळकर, काकासाहेब खाडिलकर, गंगाधर देशपांडे, डॉ बी.एस. मुंजे, अभ्यंकर, टी.बी. परांजपे आणि वामन मल्हार जोशी या लोकमान्य टिळकांच्या प्रख्यात शिष्यांपैकी ते पहिले होते. बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर अणेंनी महात्मा गांधींचे नेतृत्व स्वीकारले तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनाही राजी केले. त्यांनी काँग्रेसला खिलाफत चळवळीत सामील होण्यास विरोध केला तसेच राष्ट्रीय हिताच्या किंमतीवर मुस्लिमांना जास्त आकर्षित करण्याविरुद्ध इशारा दिला. महात्मा गांधी त्यांच्या शांत तर्काचे कौतुक करत, त्यांच्यावर विश्वास ठेवत आणि अनेकदा त्यांचा सल्ला घेत. सुभाषचंद्र बोस आणि जतिंद्र मोहन सेनगुप्ता यांच्यातील वादांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली.

ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

त्यांच्या निवडक लेखांचे ‘अक्षरमाधव’ हे पुस्तक निघाले, तर ‘श्रीतिलकयशोर्णव’ या बापूजींनी रचलेल्या संस्कृत काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.[] बापूजी अणे हे पुसद येथील जंगल सत्याग्रहाशी संबंधित आहेत. 'बापूजी अणे अन् पिवळे दोन आणे' असे त्यावेळी म्हणत असत.

हे ही पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ संजय वझरेकर. "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वतः २९ ऑगस्ट". ३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)