चारकोप विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चारकोप विधानसभा मतदारसंघ - १६१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, चारकोप मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १६६७ आणि जनगणना वॉर्ड क्र. १५६५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ५, २३ ते ५१, ५४, ३७७ आणि १४०१ ते १४०३ यांचा समावेश होतो. चारकोप हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे योगेश अमृतलाल सागर हे चारकोप विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ योगेश अमृतलाल सागर भारतीय जनता पक्ष
२०१४ योगेश अमृतलाल सागर भारतीय जनता पक्ष
२००९ योगेश अमृतलाल सागर भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".