Jump to content

तो मी नव्हेच (मराठी नाटक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तो मी नव्हेच
लेखन आचार्य अत्रे
भाषा मराठी
देश भारत
निर्मिती वर्ष १९६२
कलाकार प्रभाकर पणशीकर

तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी "लखोबा लोखंडे" ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित होती, व खटला हा बार्शीच्या कोर्टात चालू होता.

पार्श्वभूमी

[संपादन]

लखोबा लोखंडे हा आरोपी विविध लोकांना नाना प्रकारची सोंगे घेऊन फसवतो आणि त्याबद्दल कोर्टात त्याच्यावर भरण्यात आल्येला खटल्यात स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतो.

कथानक

[संपादन]

नाटकाचे कथानक बहूतेक अंशी कोर्टात घडते. आरोपीवर (जो स्वतःला नीपाणीचा तंबाखुचा व्यापारी "लखोबा लोखंडे" म्हणवून घेतो) काही लोकांना पैसे घेऊन लुबाडल्याचा तसेच काही स्त्रीयांशी खोटे लग्न करून त्यांचे दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप आहे. सरकारी वकील किरकिरे सर्व फिर्यादींना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावतात आणि त्यांची तपासणी करतात. लखोबा लोखंडे बचाव पक्षाच्या वकीलांना काढून टाकतो आणि साक्षीदारांची उलटतपासणी स्वतः करतो. तो सगळ्या साक्षीदारांना त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल आणि त्यांच्या तक्रारीबद्दल असे काही प्रश्न विचारतो की त्यावर सगळे निरुत्तर होतात. प्रत्येक उलटतपासणीचा शेवट लखोबा लोखंडे "तो मी नव्हेच" ह्या उद्गारांनी करतो.

प्रभाकर पणशीकरांनी साकारलेल्या भूमिका

[संपादन]
भूमिका चित्र
लखोबा लोखंडे: निपाणीचा तंबाखूचा व्यापारी.
हैदरअली: भिवंडीच्या सय्यद मंसूर ह्या मुसलमान खाटिकाचा धाकटा भाऊ.
मधुकर विनायक देशमुखः ह्याच्यावर वसंत अग्निहोत्री ह्या गृहस्थाला १५,००० रुपयांनी फसवल्याचा आरोप आहे.
माधव गजानन गोरे: नागपुरच्या महिला विद्यालयातील इंग्रजीचा शिक्षक.
दिवाकर दातार: इंग्लंडमध्ये शिकलेला आणि म्हैसूर राज्याच्या राजकीय खात्यात गुप्त स्वरूपाची नोकरी करणारा इसम. ह्याच्यावर सुनंदा दाते ह्या महिलेशी खोटे लग्न केल्याचा आरोप आहे.
दाजीशास्त्री दातार: किर्तनकार आणि दिवाकर दातारचे वडीलबंधू.
कॅप्टन अशोक परांजपे: दिवाकर दातारचा धाकटा भाऊ. ह्याच्यावर प्रमिला परांजपे ह्या महिलेशी खोटे लग्न केल्याचा आरोप आहे.
राधेश्याम महाराज: स्वतःला कृष्णाचा अवतार समजणारे एक ढोंगी बाबा. ह्यांच्यावर चंद्राबाई चित्राव ह्यांची मुलगी वेणू हिला फसवल्याचा (आणि ठार मारल्याचा) आरोप आहे.

उल्लेखनीय

[संपादन]
  • तो मी नव्हेच हे बहुदा जगातील पहिले नाटक असेल ज्यामध्ये एकाच कलाकाराने रगंमंचावर ५ पुर्णपणे वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.[].
  • फिरत्या रंगमंचाचा वापर करणारे तो मी नव्हेच हे मराठीमधील पहिले नाटक आहे.[]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2008-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-13 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2008-11-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-13 रोजी पाहिले.