Jump to content

पिथोरागढ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिथोरागढ जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

पिथोरागढ जिल्हा
उत्तराखंड राज्यातील जिल्हा
पिथोरागढ जिल्हा चे स्थान
पिथोरागढ जिल्हा चे स्थान
उत्तराखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
मुख्यालय पिथोरागढ
क्षेत्रफळ
 - एकूण ७,०९० चौरस किमी (२,७४० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४,८३,४३९ (२०११)
-साक्षरता दर ८२.३%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ अलमोडा
संकेतस्थळ


पिथोरागढ जिल्हा हा उत्तराखंडच्या १३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. पिथोरागढ जिल्हा उत्तराखंडच्या पूर्व भागात हिमालय पर्वतरांगेमध्ये स्थित असून त्याच्या पूर्वेस नेपाळ तर उत्तरेस चीनचा तिबेट प्रदेश आहेत. महाकाली नदीचा उगम पिथोरागढ जिल्ह्यातच होतो व ती भारत-नेपाळ सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते. कालापाणी प्रदेशलिपुलेख हा हिमालयामधील घाट पिथोरागढ जिल्ह्यामध्येच आहेत. नेपाळ व चीन ह्या दोन्ही देशांच्या सीमा असल्यामुळे पिथोरागढ भारतासाठी एक महत्त्वाचा व संवेदनशील भूभाग आहे.

२०११ साली पिथोरागढ जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४.८ लाख होती. कुमाऊँनी ही हिंदीची एक बोली ह्या भागात वापरली जाते. पिथोरागढ हे येथील एक प्रमुख शहर व जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे

[संपादन]