Jump to content

आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्ग
Map
आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्गाचे नकाशावरील स्थान
आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्ग
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ३०२.२ किलोमीटर (१८७.८ मैल)
शेवट सारोसा गाव, लखनौ जिल्हा
स्थान
शहरे आग्रा, फिरोझाबाद, इटावा, कनौज, लखनौ
राज्ये उत्तर प्रदेश

आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्ग (आग्रा–लखनौ एक्सप्रेसवे) हा उत्तर प्रदेश राज्यामधील एक प्रमुख द्रुतगती मार्ग आहे. सुमारे ३०२ किमी लांबीचा हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला लोकप्रिय पर्यटनस्थळ आग्रा ह्या शहरासोबत जोडतो. २३ नोव्हेंबर २०१४ रोजी ह्या मार्गाचे बांधकाम सुरू झाले व २१ नोव्हेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव ह्यांच्या हस्ते हा महामार्ग वाहतूकीस खुला करण्यात आला. पूर्वांचल द्रुतगतीमार्ग सुरू होण्याअगोदर आग्रा-लखनौ हा भारतामधील सर्वाधिक लांबीचा द्रुतगतीमार्ग होता. सुमारे १३,२०० कोटी रुपये इतका खर्च झालेला हा महामार्ग दिल्ली ते कोलकाता दरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १९ ला काहीसा समांतर धावतो.

आग्रा शहराला फेरी मारणाऱ्या आग्रा रिंग रोडद्वारे हा महामार्ग यमुना द्रुतगतीमार्गासोबत जोडला गेला आहे ज्यामुळे लखनौ ते नोएडा ही जलदगती रस्तेवाहतूक सुलभ झाली आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]