Jump to content

सुजाता मोहपात्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुजाता मोहपात्रा

सुजाता मोहपात्रा
आयुष्य
जन्म २७ जून १९६८
जन्म स्थान बालासोर
संगीत कारकीर्द
कार्य ओडिसी नृत्य
पेशा नृत्यांगना / नृत्य दिग्दर्शक
बाह्य दुवे
संकेतस्थळ

सुजाता मोहपात्रा (जन्म २७ जून १९६८) ह्या एक भारतीय ओडिसी नृत्यांगना आणि गुरू आहेत.[] सुजाता मोहपात्रा ह्यांनी गुरू केलुचरण मोहपात्रा ह्यांच्याकडे १८ वर्षे ओडिसी नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले.[]

सुरुवातीचे आयुष्य

[संपादन]

सुजाता मोहपात्रा ह्यांचा जन्म १९६८ साली बालासोर, ओडिसा येथे झाला. त्या सुरुवातीला गुरू सुधाकर साहू ह्यांच्याकडे ओडिसी नृत्य शिकल्या.[] त्या १९८७ साली पुढील नृत्य शिक्षणासाठी पद्मविभूषण केलुचरण मोहपात्रा ह्यांच्याकडे भुवनेश्वर, ओडिसा येथे आल्या.[] त्यांचा विवाह केलुचरण मोहपात्रा ह्यांचे पुत्र रतिकांत मोहपात्रा ह्यांच्याशी झाला.[] त्यांच्या कन्या प्रतिशा मोहपात्रा ह्याही ओडिसी नृत्यांगना आहेत.

कारकीर्द

[संपादन]

सुजाता मोहपात्रा ह्यांनी त्यांचे गुरू सुधाकर साहू ह्यांच्या नृत्य गटाबरोबर ओडिसी नृत्य सादर करायला सुरुवात केली. केलुचरण मोहपात्रा ह्यांच्याकडे शिक्षण घेतल्यामुळे त्यांची शैली सुधारली आणि त्या ओडीसातल्या त्यांच्या पिढीतल्या एक उत्तम नृत्यांगना म्हणून ओळखल्या जाउ लागल्या.[] सुजाता मोहपात्रा ह्यांनी भारत आणि इतर देशांमध्ये एकल नृत्य सादर केले आहे आणि त्या केलुचरण मोहपात्रा ह्यांच्या सृजन नृत्य गटाच्या आघाडीच्या सदस्या आहेत.[] सुजाता मोहपात्रा ह्यांनी ओडिसी नृत्य शिकवण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. मोहपात्रा ह्यांनी उत्कल विद्यापीठातून 'ओरिया साहित्य' ह्या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.[] त्यांनी ओडिसी रिसर्च सेंटर, भुवनेश्वर येथे काम केले. जुलै २०११ मध्ये त्यांनी बालासोरमध्ये 'गुरू कीर्ती सृजन' ह्या ओडिसी नृत्य शिकवणाऱ्या संस्थेची स्थापना केली.[] त्या दूरदर्शनच्या सर्वोच्च श्रेणीच्या कलाकार आहेत.

त्यांनी भारत आणि इतर देशांमध्ये ओडिसी नृत्य सादर केले आहे.त्यापैकी काही आहेत ; १९९२ साली जर्मनी येथे फेस्टीव्हल ऑफ इंडिया, १९९६ साली कॅनडा, अमेरिका आणि बेल्जियम मध्ये,१९९५ आणि १९९७ साली इटली मध्ये, १९९७ साली मलेशिया येथे, २०१२ साली ईरेझीन्ग बॉर्डर्स फेस्टिव्हल ऑफ इंडियन डान्स न्यू यॉर्क,

भारतातील संगीत महोत्सव ज्यामध्ये मोहपात्रा ह्यांनी सादरीकरण केले आहे बैसाखी फेस्टिव्हल,भुवनेश्वर ,एन सी पी ए ,मुंबई, बेंगाल क्लासिकल म्युजिक फेस्टिव्हल, २०१९ साली विरसा, जयपूर.

केलुचरण मोहपात्रा ह्यांने बसवलेले ‘गीत गोविंद’ हे बाराव्या शतकातील जयदेव नावाच्या कवीने लिहिलेले काव्य सुजाता मोहपात्रा आणि त्यांच्या गटाने जगभर सादर केले. ह्या नाटयमय नृत्यात केलुचरण मोहपात्रा ह्यांनी ओडिसी नाट्याची वेगळी उंची गाठली आहे. हे काव्य संस्कृत मधील आहे. जयदेव ह्यांनी पुरीच्या जगन्नाथासाठी लिहिले आहे. ह्या काव्यात १२ अध्याय, २४ गाणी, ८ पदे आहेत. ह्यामध्ये राधा आणि कृष्ण ह्यांच्या कथा काव्य रूपात लिहिल्या आहेत. कवी जयदेव ह्यांनी ह्या काव्याबरोबरच प्रत्येक पदाचे राग आणि ताल देखील लिहून ठेवले आहेत.[]                       

पुरस्कार

[संपादन]
  • २०१४ मध्ये कृष्ण गान सभा, चेन्नईचा नृत्य चूडामणी पुरस्कार[१०]
  • पंकज चरण ओडिसी रिसर्च फाउंडेशनचा माहारी पुरस्कार
  • वॉशिन्ग्टन डीसीचा दुसरा संजुक्ता पाणीग्रही पुरस्कार
  • आदित्य बिर्ला कला किरण पुरस्कार, मुंबई
  • रझा फाउंडेशन पुरस्कार, दिल्ली , २००८
  • होप ऑफ इंडिया,२००१ नृत्य रागिणी, पुरी,२००२
  • बैसाखी पुरस्कार
  • प्राण नट सन्मान
  • अभि नंदिका, पुरी,२००४
  • भीमेश्वर प्रतीक्षा सन्मान,२००४[११]
  • २०१८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार[१२]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Srikanth, Rupa (2010-01-29). "Statuesque postures". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-03-25 रोजी पाहिले.
  2. ^ a b Swaminathan, Chitra (2018-08-30). "Sujata Mohapatra's dance of ecstasy". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-03-31 रोजी पाहिले.
  3. ^ "The Hindu : Friday Review Hyderabad / Dance : The state of Odissi". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-11-10. 2020-03-25 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  4. ^ "A feast for Delhi dance lovers". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2005-08-12. ISSN 0971-751X. 2020-03-25 रोजी पाहिले.
  5. ^ Jul 27, Kamini Mehta | TNN |; 2015; Ist, 18:01. "Odissi dancer Sujata Mohapatra mesmerizes school students | Chandigarh News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-03-25 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  6. ^ "The Hindu : Friday Review Hyderabad / Dance : 'Discipline makes a good dancer'". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2008-10-02. 2020-03-25 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  7. ^ "IPAAC Home". www.ipaac.org. 2017-08-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-25 रोजी पाहिले.
  8. ^ "Interview - Sujata Mohapatra - Kiran Rajagopalan". narthaki.com. 2020-03-25 रोजी पाहिले.
  9. ^ "Odisha HRD » Dance: Odissi". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-09-27. 2020-03-25 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  10. ^ "Awards for veterans". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2014-12-01. ISSN 0971-751X. 2020-03-25 रोजी पाहिले.
  11. ^ "Sujata Mohapatra - Odissi Dancer | Awards". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-09-27. 2020-03-25 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  12. ^ "Sangeet Natak Akademi awards for 2018 announced". ANI News (इंग्रजी भाषेत). 2020-03-26 रोजी पाहिले.