Jump to content

वाढवण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?वाढवण

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ५५′ ४५.२३″ N, ७२° ४०′ २१.९६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ०.३५२७ चौ. किमी
जवळचे शहर डहाणू
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,२७८ (२०११)
• ३,६२३/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा भंडारी,मांगेली,आगरी,सुतारी,वाडवळी.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०३
• +०२५२८
• एमएच/४८ /०४

वाढवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे वाढवण रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.मासेमारी हा येथील मुख्य व्यवसाय आहे.येथे बऱ्याच कुटुंबात वडिलोपार्जित डायमेकीग धंदा आहे आणि येथील डायकामे भारतात तसेच परदेशात निर्यात केली जातात. येथे अलीकडे उडता मासा पाहावयास मिळाला.(महाराष्ट्र टाईम्स वसई विरार प्लस. ०९/१२/२०२०)

लोकजीवन

[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९६ कुटुंबे राहतात. एकूण १२७८ लोकसंख्येपैकी ६३९ पुरुष तर ६३९ महिला आहेत. गावाची साक्षरता ९१.५८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९५.८६ आहे तर स्त्री साक्षरता ८७.३३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११४ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ८.९२ टक्के आहे.पांचाळ,भंडारी,आगरी,मांगेली,वैती आणि वाडवळ समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात.येथील समाज डायकाम, मत्स्यव्यवसाय,ताडीव्यवसाय, दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन अश्या निरनिराळ्या उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत.ज्वेलरी डायमेकींग हा शतकापेक्षा जुना असलेला गृहउद्योग इथे पिढ्यानपिढ्या चालू आहे.हा भारत देशाबरोबरच दुबई, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशातील सोने व्यापाऱ्यांचे मुख्य आकर्षण आहे. सोन्याच्या दागिन्यांवर आकर्षक आणि नाजूक नक्षीकाम करण्याचे कसब लाभलेले असे शेकडो डायमेकर्स आजुबाजूच्या परिसरात आहेत.

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

[संपादन]

पोखरण, गुंगावाडा, वाडापोखरण, चंडीगाव, आंबिस्तेवाडी, वरोर, वासगाव, मोठगाव, वादडे, ओसरवाडी, तणाशी ही जवळपासची गावे आहेत.वाढवण गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.

संदर्भ

[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

८.महाराष्ट्र टाईम्स ०९/१२/२०२० वसई विरार पुरवणी