Jump to content

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या ५९ आहे.[] २०११ च्या जनगणनेनुसार, राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या १,३२,७५,८९८ (११.८१%) असून त्यात पुरुष ६७,६७,७५९ व स्त्रिया ६५,०८,१३९ आहेत. भारतातील एकूण २०.१४ कोटी अनु. जातींपैकी ६.६% अनु. जाती महाराष्ट्रात आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६चा १०८ वा) मधील परिशिष्ट १ मधील भाग - १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जातीतील ५९ प्रकारच्या जातींसाठी एकूण आरक्षण १३% आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये महार (५७.५%), मांग (२०.३%), भांबी/चांभार (१२.५%) व भंगी (१.९%) ह्या प्रमुख चार समाजाची लोकसंख्या ९२% आहे. लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वाधिक (१९.४%) आहे. २०११ च्या census नुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अनुसूचित जातींचे प्रमाण आहे.[ संदर्भ हवा ]

यादी

[संपादन]

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या समूदायांची आणि त्यांच्या लोकसंख्येच्या यादी खालीलप्रमाणे आहे.[]

क्रमांक जाती लोकसंख्या २००१ एकूण अनु.जाती लोकसंख्येची टक्केवारी
अगेर ५९७ %
अनमुक १४ %
आरेमाला ३८४ %
अरवा माला ४६५ %
बहना बहाना १०९ %
बाकड, बंट ६७९ %
बलाही, बलाई १३,६७१ %
बसोर , बुरुद, बांसोर, बांसोडी ४३,६१६ %
बेडाजंगम, बुडगा जंगम ४२,२०६ %
१० बेडर १७,४६७ %
११ भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी,चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चामार (शा.नि. दि. १५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट) १२,३४,८७४ १२.५%
१२ भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला (शा.नि. दि.१५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट) १,८६,७७६ १.९%
१३ बिंदला ६२९ %
१४ ब्यागारा १९ %
१५ चलवादी, चन्नया २,३८४ %
१६ चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी ४०० %
१७ डक्कल, डोक्कलवार ४४२ %
१८ ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर ९०,२२६ %
१९ डोम, डुमार ३,३३७ %
२० येल्लमलवार, येल्लमलवंडलु ३,०१२ %
२१ गंडा, गंडी ४२० %
२२ गरोड,गारी ३६१ %
२३ घासी,घासीया १,१९० %
२४ हल्लीर ९८ %
२५ हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, हलसवार (शा.नि. दि.१५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट) १०० %
२६ होलार, व्हलार ७९,४६१ %
२७ होलय, होलेर, होलेया, होलिया १४,५८७ %
२८ कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्हे व राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्हा यांत) ५,२३२ %
२९ कटिया, पथरिया १,९२१ %
३० खंगार, कनेरा, मिरधा १,४०५ %
३१ खाटिक, चिकवा, चिकवी ८९,९६९ %
३२ कोलूपूल-वंडलु १६ %
३३ कोरी ९,७४९ %
३४ लिंगडेर १,१०,१९३ %
३५ मादगी ५०,९९२ %
३६ मादिगा ६,४३२ %
३७ महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू ५६,७८,९१२ ५७.५%
३८ माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर १२,६१२ %
३९ माला ७,९७३ %
४० माला दासरी १,०९४ %
४१ माला हन्नाई २८ %
४२ माला जंगम १९,५८९ %
४३ माला मस्ती ३१ %
४४ माला साले, नेटकानी १९४ %
४५ माला सन्यासी ५६ %
४६ मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग २०,०३,९९६ २०.३%
४७ मांग-गारोडी, मांग-गारुडी २५,२६० %
४८ मन्ने १,७२८ %
४९ मस्ती २०६ %
५० मेंघवाल, मेंघवार ३५,५९४ %
५१ मिठा, अयलवार ३५,३२९ %
५२ मक्री ७२ %
५३ नाडीया,हादी ३४५ %
५४ पासी १६,६८३ %
५५ सांसी ३८९ %
५६ शेणवा, चेणवा, सेडमा, रावत ४१९ %
५७ सिंधोल्लू, चिंदोल्लू ४६ %
५८ तिरगार, तिरबंदा १७० %
५९ तुरी १८७ %

धर्म

[संपादन]

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% हिंदू, ३२.९% बौद्ध व ०.१% (५,९८३) शीख होते. तर २०११ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये ६०.७% (सुमारे ८०.१२ लाख) हिंदू, ३९.२% (५२,०४,२८४) बौद्ध व ०.१% (१३ हजार) शीख आहेत. २००१-११ या कालावधीत महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.[]

२००१ मध्ये, महार समुदायाच्या लोकसंख्येत ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघे ०.१% शीख होते. तर २०११ मध्ये, राज्यात सुमारे ७६ लाख महार समाज आहे, महारांत सुमारे ६२% (४७.१२ लाख) बौद्ध, ३७.९% (२८.७३ लाख) हिंदू, तर अवघे ०.१% (७.८ हजार) महार हे शीख धर्मीय आहेत.

२०११ मध्ये, अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ७६ लाख महार, २६.८ लाख मांग, १६.५ लाख चांभार व २.५ लाख भंगी या समाजाचे लोक आहेत. अनुसूचित जातीत या चार जातींचे एकत्रित प्रमाण ९२% आहे.

अनुसूचित जातीमध्ये बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. इ.स. २००१ मध्ये भारत देशात ४१.५९ लाख बौद्ध हे अनुसूचित जातीचे होते, तर इ.स. २०११ मध्ये हे प्रमाण ३८% वेगाने वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी ५२.०४ लाख (९०% पेक्षा अधिक) महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ७९.६८% अनुसूचित जाती आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://socialjustice.nic.in/UserView/index?mid=76750
  2. ^ https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html
  3. ^ "Buddhism is the fastest growing religion among Scheduled Castes" (इंग्रजी भाषेत).