पुरुषोत्‍तम भापकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जन्‍म व शिक्षण[संपादन]

पुरूषोत्‍तम निवृत्‍ती भापकर यांचा जन्‍म सालवडगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्‍यांचे शिक्षण एम.ए. अर्थशास्‍त्र, एल.एल.बी., पीएच.डी. (कृषी अर्थशास्‍त्र) झाले आहे. सध्‍या ते भारतीय प्रशासकीय सेवेमराठवाडा विभागाचे आयुक्‍त म्‍हणून कार्यरत आहेत. ते गीतकार, कवी आहेत. त्यांलची गीतं सुरेश वाडकर, चंद्रशेखर गाडगीळ, उत्त‍रा केळकर, अतुल दिवे, ज्योत्ना राजोरिया या गायकांनी गायलेली आहेत.

भूषविलेली पदे[संपादन]

साहित्‍यसंपदा[संपादन]

  • हे शक्‍य आहे
  • चांदणं उन्‍हातलं (कवितासंग्रह) २०१७, आदित्य प्रकाशन, औरंगाबाद
  • आकांत शांतीचा (कवितासंग्रह) २०१७, आदित्य प्रकाशन, औरंगाबाद

पुरस्‍कार व मानसन्‍मान[संपादन]

  • जणगणना संदर्भात 'राष्‍ट्रपती सिल्‍व्‍हर मेडल' -१९९१
  • सर्वोत्‍कृष्‍ठ अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी महाराष्‍ट्र शासनाचा पुरस्कार-२००२-२००३
  • भारत ज्‍योती अवॉर्ड, इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोयायटी, नवी दिल्‍ली-२००५
  • वीर एकलव्‍य राष्‍ट्रीय पुरस्‍कार, भारतीय दलित साहित्‍य अकादमी, नवी दिल्‍ली-२००६
  • राज्‍यस्‍तरीय प्रशासन रत्‍न पुरस्‍कार, अण्‍णाभाऊ साठे प्रतिष्‍ठान, धुळे-२००६
  • डॉ. मणिभाई देसाई राष्‍ट्रसेवा पुरस्‍कार, उरळी कांचन, पुणे-२००६
  • महात्‍मा गांधी शांतता पुरस्‍कार, म.शा. अल्‍पसंख्‍याक आयोग-२००८
  • जाणीव पुरस्‍कार, जाणीव सांस्‍कृतिक अभियान, अहमदनगर-२००८
  • राज्‍यस्‍तरीय मल्हार रत्‍न पुरस्‍कार, मल्‍हार क्रांती संघटना, अमरावती-२००८
  • वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्‍कार- २०११
  • पीपीपीचा पुरस्‍कार- २०११
  • युगंधर पुरस्‍कार, औरंगाबाद येथे मनपा आयुक्‍त म्‍हणून केलेल्या कार्याबद्दल- २०१२
  • विकास भूषण पुरस्‍कार, कै. काकासाहेब म्‍हस्‍के मेमोरी मेडिकल फाऊंडेशन तर्फे-२०१२
  • कर्मवीर भाऊराव पाटील राज्‍य वाड्.मय पुरस्‍कार 'हे शक्‍य आहे' - २०१७