Jump to content

गजलांकित प्रतिष्ठान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गजलांकित प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील गजल मुशायरे, गजलगायन मैफिली अशा कार्यक्रमांचे व गजलविषयक उपक्रमांचे आयोजित करणारी संस्था आहे. ही संस्था १४ जून २०१३ रोजी जनार्दन केशव म्हात्रे यांनी स्थापन केली.

गजल मुशायरे

[संपादन]

या संस्थेने ठाणे येथे १४ मार्च २०१४ रोजी सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त पहिला गजल मुशायरा ठाणे येथे आयोजित केला. त्यानंतर ठाण्यासह मुंबई, वाशी, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक अशा राज्यभरांतील विविध ठिकाणी मुशायरे झाले.

गजल गायन मैफिली

[संपादन]

कोणत्याही काव्य, गीत, गजल या विषयांमध्ये गायन कलेला वेगळे महत्त्व आहे. गेय साहित्य रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी गायन क्षेत्राचे योगदान नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल मुशायऱ्यांच्या सोबतीने गजल गायन मैफिलींचे देखील आयोजन करीत असते.

गजल पुरस्कार

[संपादन]

गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी, गजल क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करते.

गजलांकित पुरस्कारांबद्दल माहिती

[संपादन]
गजलांकित गजलरत्‍न पुरस्कार
[संपादन]

या पुरस्कारासाठी उत्तम कविता, उत्तम गजल लेखनासोबतच दीर्घकाळ मराठी कविता व गजलेला आपले भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गजलकार व्यक्तीला गजलरत्‍न हा पुरस्कार देण्यात येतो.

गजलांकित गजलसृजन पुरस्कार
[संपादन]

उत्तम कविता, उत्तम गजल लेखनासोबतच कविता व गजल या दोन्ही क्षेत्रात विशेष कामगिरी करण्याऱ्या कवी, गजलकारांना "गजलसृजन" हा पुरस्कार दिला जातो.

गजलांकित गजलांकुर पुरस्कार
[संपादन]

सातत्याने सकस आणि दर्जेदार कविता व गजल लिहिणाऱ्या नव्या दमाच्या कवी, गजलकारांसाठी प्रोत्साहन ठरू शकेल, असा "गजलांकुर" हा पुरस्कार आहे..

गजलांकित गजलगुंजन पुरस्कार
[संपादन]

गजल सादरीकरणातील "तरन्नुम" हा प्रकार तसा फार कमी अनुभवायला मिळतो. उर्दू गजलमध्ये हा प्रकार बरेचदा ऐकायला मिळतो. गजलकाराने आपलीच रचना सुरेल पद्धतीने संगीतवाद्याच्या साथीशिवाय सादर करणे, याला तरन्नुम म्हणतात.. तरन्नुममधून गजलकाराला किती छान गाता येते आहे, यापेक्षा त्या छान गायनातून भाव किती चपखल पोहचतो आहे, हेच अधिक महत्त्वाचे असते. तरन्नुम सादर करण्यासाठी गजलकाराला संगीताचे जुजबी का होईना ज्ञान असणे गरजेचे आहे. यासोबतच सुरांची योग्य ओळख, जाण असण्यासोबत गळ्यात सूर असणे नितांत गरजेचे आहे. यात तो किंवा ती गजलकार गायनकलेत निपुण असेल तर दुधात साखरच... गजलसादरीकरणाचा हा सुरेल प्रकार "योग्य रीतीने" रुजला पाहिजे, याच्याच प्रयत्‍नाचा एक भाग म्हणून उत्तम कविता, उत्तम गजल लेखनासोबतच तरन्नूममध्ये उत्तम रीत्या गजल सादर करणारी एक स्त्रीगजलकार व एक पुरूष गजलकार निवडून अशा गजलकरांना "गजलगुंजन" हा पुरस्कार दिला जातो.

गजलांकित गजलउत्कर्ष पुरस्कार
[संपादन]

सकस आणि दर्जेदार कविता व गजल लिहिण्यासोबत गजल क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गजलउत्कर्ष हा पुरस्कार दिला जातो.

गजलांकित पुरस्कार विजेते
[संपादन]
  • दिलीप पांढरपट्टे : गजलरत्‍न २०१५
  • सदानंद डबीर : गजलरत्‍न २०१६
  • संगीता जोशी : गजलरत्‍न २०१६
  • पवन नालट : गजलसृजन २०१६
  • अल्पना नायक : गजलांकुर २०१६
  • आनंद पेंढारकर : गजलगुंजन २०१६
  • नितीन देशमुख : गजलगुंजन २०१६
  • गाथा जाधव : गजलगुंजन २०१६

गजल परिसंवाद

[संपादन]

गजलेविषयी चर्चा घडवून आणण्यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील अभ्यासकांना बोलावून परिसंवाद आयोजित करत असते.

काही महत्त्वाचे परिसंवाद

[संपादन]
  • आशयप्रधान गजल गायन : सहभाग - डॉ. आशिष मुजुमदार, विनय राजवाडे, मिलिंद जोशी, जनार्दन केशव म्हात्रे
  • गजल आणि जाणिवा : सहभाग - संगीता जोशी, डॉ. सुनंदा शेळके, डॉ. दिलीप पांढरपट्टे, मोनिका सिंग
  • आजची मराठी गजल : सहभाग - डॉ. राम पंडित, सदानंद डबीर, प्रा. अशोक बागवे, मिलिंद जोशी, जनार्दन केशव म्हात्रे

गजल क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती

[संपादन]

मराठी गजलेविषयक अधिकाधिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचे आयोजन करत असते.

काही महत्त्वाच्या मुलाखती

[संपादन]

डावीकडील ठळक नाव - मान्यवर व्यक्ती : उजवीकडील नाव - मुलाखतकार[माहितीज्ञान पोकळी]

अविश्वकोशीय मजकुर

संदर्भ व बाह्यदुवे

[संपादन]