Jump to content

सदानंद डबीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तसबीर संग्रहाचे मलपृष्ठ व सदानंद डबीर
तसबीर ग़ज़ल व काव्य संग़्रह
सदानंद डबीर यांच्या पुस्तकांची यादी

सदानंद डबीर हे एक मराठी गझलकार आहेत. सुरेश भटांनंतर ज्यांनी ज्यांनी मराठी गझलेवर आपला ठसा उमटवला त्यांत सदानंद डबीर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डबीरांच्या कितीतरी तरल, हळुवार, आशयघन रचनांची मोहिनी अनेक संगीतकारांना, गायकांना पडली. अशोक पत्की, आशा खाडिलकर, मिलिंद जोशी, यशवंत देव, इत्यादी संगीतकार व अजित कडकडे, देवकी पंडित, राणी वर्मा, वैशाली सामंत इत्यादी गायकांनी त्यांच्या रचनांना न्याय देऊन त्या सीडीबद्ध केल्या आहेत.

गझलांबरोबरच सदानंद डबीर यांचे गझलांविषयक अभ्यासपूर्ण लेखही प्रसिद्ध झाले आहेत.

ऑक्टोबर २०२०पर्यंत डबीर यांचे नऊ गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ते असे :
  • अलूफ
  • आनंदभैरवी
  • काळिजगुंफा
  • खयाल
  • गारूड गझलचे
  • छांदस (या पुस्तकात डबीरांच्या निवडक ९७ गझला, २६ कविता आणि १३ गीते/शब्दशलाका-छोट्या मुक्त कविता- आहेत.)
  • तिने दिलेले फूल
  • लेहरा
  • तसबीर - ग़ज़ल व काव्य संग़्रह (ऑक्टोबर - २०२०) ह्या शिवाय सावलीतली उन्हे हा "साये में धूप - दुष्यंत कुमार" ह्यांच्या ग़ज़लांचा वृत्तबद्ध मराठी भावानुवाद त्यांनी केला आहे व अन्य पुस्तके सुद्धा आहेत.

पुरस्कार

[संपादन]