अरबी लिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरबी लिपी ही जगामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी लिपी आहे. अरबी लिपी मध्य-पूर्वउत्तर आफ्रिकेमधील अरबी, फारसी, दारी, उय्गुर, कुर्दी, पंजाबी, सिंधी, बाल्टी, बलुची, पश्तो, लुरी, उर्दू, काश्मिरी, रोहिंग्य, सोमाली इत्यादी अनेक भाषा लिहिण्यासाठी वापरली जाते. १६व्या शतकापर्यंत स्पॅनिश तसेच १९२८ सालापर्यंत तुर्की ह्या भाषा देखील अरबी लिपीमध्येच लिहिल्या जात असत.

अरबी वर्णमालाफारसी वर्णमाला ह्या दोन प्रमुख वर्णमाला अरबी लिपीपासूनच तयार झाल्या आहेत.